शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'त्या' विमान कंपनीकडून सगळे नियम धाब्यावर; अनेक देशांत पोहोचला कोरोनाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 2:59 PM

1 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्या देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे वाहतुकीवर निर्बंध आले. विमान वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
2 / 10
जगभरातल्या कंपन्यांची विमान सेवा बंद असताना इराणच्या महान एअर कंपनीची विमानं उड्डाणं करत होती. या विमानांमधून कोरोना रुग्णांनीदेखील प्रवास केला. त्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोना पोहोचला.
3 / 10
बीबीसी अरबीनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इराणनं ३१ जानेवारीला चीनकडे जाणारी आणि येणारी विमान वाहतूक थांबवली. मात्र यानंतरही इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित महान एअरची विमानसेवा सुरू होती. चीन आणि इतर देशांच्या मार्गावर महानची सेवा सुरू होती.
4 / 10
हवाई निर्बंध लागू झाल्यानंतर महान एअरची विमानं उड्डाणं करत होती. याबद्दल कंपनीनं खोटी माहिती दिली. इराणची राजधानी तेहरान आणि चीनच्या विमानतळावरील तपशीलावरुन महान एअरचा खोटारडेपणा उघडकीस आला.
5 / 10
महान एअरची विमानं मार्चपर्यंत उड्डाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. ६ फेब्रुवारीला चीनच्या वुहानमधून ७० इराणी विद्यार्थ्यांना घेऊन महान एअरचं विमान माघारी परतलं. यानंतर विमान कंपनीवर बरीच टीका झाल्यानं सेवा बंद करण्यात आल्याचं महाननं सांगितलं.
6 / 10
फ्लाईटरडार24 कडे असलेल्या तपशीलावरुन मात्र वेगळीच माहिती समोर आली. २३ फेब्रुवारीपर्यंत महान एअरची विमान सेवा सुरू होती. बीजिंग, शांघाय, गुआंझाऊ, शेनझेनमधून मिहान एअरच्या तब्बल ५५ विमानांनी उड्डाणं केल्याचा तपशील फ्लाईटरडार24 नं दिला आहे.
7 / 10
इराक आणि इराणमध्ये सापडलेले कोरोनाचे पहिले रुग्ण महान एअरशी संबंधित आहेत. चीन ते तेहरान मार्गावर उड्डाण करणारी विमानंच पुढच्या २४ तासांत बार्सिलोना, दुबई, क्वालालंपूर आणि इस्तंबूलला गेली.
8 / 10
महान एअरच्या विमानांमधील कर्मचाऱ्यांनी पीपीईच्या कमतरतेचा आणि संक्रमण रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना गप्प राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
9 / 10
मदत पोहोचवण्यासाठी विमानसेवा सुरू ठेवण्यात आली होती, असा दावा महान एअरनं केली.
10 / 10
बीबीसीनं मात्र त्यांच्या वृत्तात हा दावा खोडून काढला. मदत पोहोचवण्यासाठी नव्हे तर प्रवाशांच्या वाहतुकीसाठीच महानची विमानं उड्डाणं करत होती, असं बीबीसीनं म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या