शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus जगभरात मृत्यूंचा आकडा १५००० पार; भारताच्या दुप्पट लोकसंख्या घरात बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 7:46 PM

1 / 12
एकवीसाव्या शतकामध्ये जग एका भयानक संकटातून जात आहे. कोरोनाने जगभरातील १८८ देशांना कवेत घेतले असून मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
2 / 12
एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या ५ हजारावर जाऊन पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या चीनमध्ये या व्हायरसचा जन्म झाला तिथे केवळ सव्वा तीन हजार लोकांचाच मृत्यू झाला आहे.
3 / 12
भारतामध्ये आज आठव्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. कोलकातामध्ये ६४ वर्षीय वृद्धाचा आज मृत्यू झाला. तर स्पेनमध्ये आजच्या दिवसभरात ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
4 / 12
पृथ्वीवर एकूण ७.७ अब्ज लोकसंख्या राहते. यापैकी १ अब्ज म्हणजेच १२० कोटींच्या आसपास लोक घरामध्ये बंद झाले आहेत.
5 / 12
आजचा भारतातील संचारबंदीचे आदेश पाहता जवळपास आणखी १३० कोटी लोक घरामध्ये बंद राहणार आहेत. म्हणजेच हा आकडा अडीचशे कोटींवर जाणार आहे. हा आकडा ५० देशांचा आहे.
6 / 12
न्युझीलंडमध्येही व्हायरस पसरायला लागला असून गेल्या २४ तासांत ४८ नवे रुग्ण सापडले आहेत. तर स्पेनमध्ये एकूण २१८२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
7 / 12
जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३.५ लाखांवर गेला असून 15,408 जणांचा मृत्यू झाला आहे.
8 / 12
यापैकी १ लाखावर लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. तर 237,253 एवढे रुग्ण विविध देशांमध्ये उपचार घेत आहेत.
9 / 12
भारतात १६ राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 380 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ४१ परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्र, पंजाबमध्ये नागरिक ऐकत नसल्याने संचारबंदीच लागू करण्यात आली आहे.
10 / 12
अमेरिका जगातील तिसरा सर्वाधिक कोरोनाग्रस्त देश बनला आहे. अमेरिकेने स्पेन, इटली, ईराणला मागे टाकले आहे. अमेरिकेत ३५ हजार लोकांना बाधा झाली असून ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
11 / 12
पाकिस्तानमध्ये इस्लामाबादसह, कराची आणि अन्य शहरांमध्ये लष्कराला रस्त्यावर उतरावे लागले आहे. भारतात ही परिस्थिती नसून गरज पडल्यास भारतीय जवानही रस्त्यांवर गस्त घालणार आहेत.
12 / 12
सार्क देशांमध्ये कोरोनाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. येथे ८०४ कोरोनाचे रुग्ण असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सर्वाधिक सिंध आणि पंजाब प्रांत प्रभावित झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारतItalyइटलीPakistanपाकिस्तान