Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 08:09 IST2020-05-19T08:05:58+5:302020-05-19T08:09:57+5:30

जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ लाखांहून जास्त लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. साडेतीन लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न केले जात आहेत.

चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगातील सर्व देशांसमोर आव्हान उभं केले आहे. अशा परिस्थितीत बरेच देश या साथीच्या रोगावर लसीच्या शोधात आहेत.

जगभरातील सर्व प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ दिवसेंदिवस प्रयत्न करत आहेत की ही लस लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, अमेरिकेची औषध कंपनी मोडर्ना यांनी कोरोना लस बनवण्याची आशा निर्माण केली आहे.

लस तयार करण्याच्या प्रक्रियेत कंपनीने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने या लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे आणि मानवी चाचणीचे निकाल देखील बरेच चांगले मिळाले आहेत असं सांगण्यात आलं आहे.

लस तयार करण्याच्या प्रक्रियेत कंपनीने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने या लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे आणि मानवी चाचणीचे निकाल देखील बरेच चांगले मिळाले आहेत असं सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जर तिसरा टप्पा यशस्वी झाला तर कंपनी लस बनविण्याच्या परवान्यासाठी अर्ज करू शकेल. मॉडर्ना ही आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी करणारी पहिली औषध कंपनी आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटलं होतं की वर्षाच्या अखेरीस कोरोना लस शोधण्यात अमेरिकेला यश येईल.

आरएनए-आधारित लस एमआरएनए -१२७३ ची मानवी चाचण्या जाहीर करण्याची व अंमलात आणणारी मॉडर्ना कंपनी ही पहिली अमेरिकन कंपनी होती. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी अॅन्ड इन्फेक्टीक डिसिसीज (एनआयएआयडी) च्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यातील अभ्यासानुसार कंपनीने त्याच्या लसीच्या मानवी चाचण्यांवरील सकारात्मक निकालांची माहिती देखील जाहीर केली.

पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये एमआरएनए-१२७३ या लसीचा परिणाम सुरक्षित आणि यशस्वी झाला आहे, अशी माहिती फार्मा कंपनीने दिली. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीत भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस २५, १०० किंवा २५० मायक्रोग्रामचा डोस दिला गेला.

प्रत्येक डोसच्या गटामध्ये १५ लोक ठेवण्यात आले होते. अंतरिम निकालांमध्ये असे दिसून आलं की अँन्टीबॉडी समान पातळीवर होते ज्यात सामान्यत: कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळते.

मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल म्हणाले की, आजच्या पहिल्या टप्प्यातील सकारात्मक आकडेवारीमुळे आमची टीमने जुलै महिन्यात फेज III चा अभ्यास सुरू करण्यासाठी शक्य तितक्या वेगाने पुढे जाण्यावर भर दिला आहे. यशस्वी झाल्यास परवान्यासाठी अर्ज करेल.

















