coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:28 PM2020-05-05T12:28:43+5:302020-05-05T12:44:12+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील बहुतांश देशांमध्ये झालेला आहे. दरम्यान, जगातील विविध भागात होत असलेल्या कोरोनाच्या प्रसारासोबत आता काही धक्कादायक बाबीही समोर येऊ लागल्या आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील बहुतांश देशांमध्ये झालेला आहे. दरम्यान, जगातील विविध भागात होत असलेल्या कोरोनाच्या प्रसारासोबत आता काही धक्कादायक बाबीही समोर येऊ लागल्या आहेत.

यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग हा माणसांसोबतच वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरांना झाल्याचे समोर आले होते. पण आता बोकडांनाही कोरोनाची बाधा होत असल्याची बाब समोर आली आहे.

एका आफ्रिकन देशात माणसांसोबतच बकरी आणि फाळांनाही कोरोना संसर्ग झाल्याचे कोरोना चाचण्यांमधून समोर आले आहे. या आफ्रिकन देशाचे नाव आहे. टंझानिया.

टंझानियामध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी माणसांसोबतच इतर प्राणी आणि फळांचे नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये एक बकरी आणि पॉपॉ या स्थानिक फळाचे चाचणी नमुने पॉझिटिव्ह आले.

दरम्यान, बकरी आणि फळांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर टंझानियाचे राष्ट्रपती जॉन मागुफुली यांनी देशात मागवण्यात आलेल्या टेस्टिंग किट सदोष असल्याचे सांगत त्यांच्या तपासणीची मागणी केली आहे.

आपल्या देशात कोरोनाच्या टेस्टिंग किट परदेशातून मागवण्यात आल्या आहेत. त्यात काही गडबड असू शकते. बकरी आणि पॉपॉ फळाला कोरोनाचा संसर्ग कसा काय होऊ शकतो.

दरम्यान, देशातील कोरोना विषाणूची प्रकरणे लपवल्याप्रकरणी टंझानियेचे राष्ट्रपती मागुफुली यांच्यावर टीका झाली होती.

मागुफुली यांनी आपल्या लष्कराला टेस्टिंग किटची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

टंझानियामध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी बकरी, पॉपॉ फळाचे नमुने घेण्याच आले होते. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता बकरी आणि पॉपॉ फळाचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले

दरम्यान, या गोंधळामुळे टंझानियामध्ये अनेक लोक कोरोनाबाधित नसल्याचे समोर येत आहे. मात्र आपण याची पुन्हा चाचणी केली पाहिजे, असा दावा राष्ट्रपती मागुफुली यांनी केला आहे.

टंझानियामध्ये रविवारपर्यंत कोरोनाचे एकूणू ४८० रुग्ण सापडले होते. तर १७ जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, कोरोनावरील उपचारांसाठी मदागास्कार येथून हर्बल औषधे आणण्यासाठी एक विशेष विमान पाठवत असल्याची घोषणा राष्ट्रपती मागुफुली यांनी केली आहे.