Corona Vaccine : कोरोनाची लस मिळेना, या देशातील नागरिकांनी केली घोड्याला देण्यात येणारे औषध घेण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:17 PM2021-04-12T13:17:48+5:302021-04-12T13:36:31+5:30

Corona Vaccine: कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगातील अनेक भागात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.

कोरोना विषाणूने पुन्हा एकदा जगातील अनेक भागात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत.

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेल्या फिलिपीन्समधील लोक घोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा वापर कोरोनापासून बचाव करणारे औषध म्हणून करत आहेत. मात्र फिलिपीन्समध्ये या औषधाच्या मानवी वापराची परवानगी देण्यात आलेली नाही.

फिलिपीन्समध्ये कोरोना लसीची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. तसेच या साथीबाबत लोकांचा सरकारवर असलेला विश्वासही कमी झाला आहे. त्याशिवाय फिलिपीन्समधील अनेक रुग्णालयात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक कोरोना लसीबाबत चिंतीत आहेत. तसेच तातडीचा उपाय म्हणून साइड इफेक्ट्सची चिंता न करता lvermectin नावाच्या औषधाचा वापर करत आहेत.

या औषधांचा वापर हा घोड्यांवर केला जातो. मार्च महिन्यात या औषधाबाबत फिलिपिन्समध्ये ७०० टक्के अधिक अॉनलाइन सर्च करण्यात आले. या औषधाचा प्रभाव असा आहे की, देशातील काही नेते आणि सोशल मीडिया इंफ्लूएंझर्ससुद्धा या औषधाला कोरोनावरील लसीप्रमाणे प्रमोट करत आहेत. मात्र तज्ज्ञ हे दावे चुकीचे असल्याचे सांगत आहेत.

फिलिपिन्समध्ये हे औषध मानवी उपयोगासाठी नोंदणीकृत करण्यात आलेले नाही. म्हणजेच या औषधाची विक्री फिलिपिन्समध्ये अवैध आहे. आयव्हरमेक्टिन हे औषध तयार करणाऱ्या मर्क या कंपनीनेही कोरोना लसीचा पर्याय म्हणून हे औषध योग्य नसल्याचे संशोधनातून समोर आल्याचे म्हटले आहे. मात्र तरीही या औषधांची लोकप्रियता वाढत आहे.

Ivermectin या औषधाच्या वापरामधील एक अडचण त्याची वेगवेगळी व्हर्जन ही आहे. अमेरिकेत या औषधाच्या एका व्हर्जनला मानवी वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र ट्रॉपिकल डिसीज आणि Lice साठी कोरोनाच्या आजारात या औषधाच्या वापराची परवानगी नाही आहे. तसेच फिलिपिन्समध्ये मानवी औषध म्हणून या औषधाला परवानगी देण्यात आलेली नाही.

९ एप्रिलपर्यंत फिलिपिन्समध्ये कोरोनाचे एक लाख ६७ हजार रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनामुळे १४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक घरीच उपचारांविना मरत आहेत, असेही स्थानिक मीडियाने म्हटले आहे.

यूएस फूड अँड ड्रग्स ने या औषधाच्या दुष्परिणामांची यादी प्रसिद्ध केली आहे. तर डब्ल्यूएचओने केवळ क्लीनिकल ट्रायलमध्ये या औषधाच्या वापर करावा, असे म्हटले आहे

मात्र असे असले तरीही या औषधामुळे कोरोना होण्यापासून बचाव करता येईल, किंवा या साथीमधून सहीसलामतरीत्या बाहेर पडता येईल, असे अनेकांना वाटते. फिलिपिन्स सरकारने याबाबत इशारा दिला आहे. तरीही सोशल मीडिया, चँट ग्रुप आणि ई कॉमर्स साइटवर या औषधाचा बाजार धडाक्यात सुरू आहे.