शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवसातून 20 वेळा धुणे पडले महागात, त्वचारोग झाल्यानंतर द्यावे लागले 44 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 6:33 PM

1 / 10
लंदन: कोरोना सुरु झाल्यापासून सतत हात धुण्यास सांगितलं जातं. पण, एका बेकरी मालकाला आपल्या कर्मचाऱ्याला सतत हात धुवायला लावणं चांगलंच महागात पडलयं.
2 / 10
बेकरीचा मालक आपल्या कर्मचाऱ्याला दिवसातून कमीत-कमी 20 वेळा हात धुवायला लावायचा, असा आरोप सुसान रॉबिन्सन नावाच्या एका कर्मचाऱ्यानं केला आहे.
3 / 10
दरम्यान दिवसातून अनेकवेळा साबणानं हात धुतल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला त्वचेचा गंभीर आजार झाला. यानंतर नुकसान भरपाई म्हणून कंपनीला त्या कर्मचाऱ्याला 43,81,495 रुपये द्यावे लागले.
4 / 10
59 वर्षीय सुसान रॉबिन्सन वेस्ट यॉर्कशायरच्या वेकफील्डमधील एका फॅक्टरीमध्ये काम करायचे. ही कंपनी मोठ्या सुपरमार्केट चेनसाठी मफिन, कपकेक आणि इतर बेकरी प्रोडक्ट बनवते.
5 / 10
मिररने SWNS वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमससाठी बेकरी प्रोडक्त बनवताना कंपनीनं सहा महिने रॉबिन्सनला दिवसातून वीसवेळा हात धुवायला लावले.
6 / 10
इतक्यावेळा साबनानं हात धुतल्यामुळे रॉबिन्सच्या हाताला खास सुरू झाली आणि या खाजेचं रुपांतर हळुहलू मोठ्या त्वचारोगात झालं.
7 / 10
डॉक्टरांकडे गेल्यावर रॉबिन्सनचे अनेक टेस्ट करण्यात आले, त्यातून त्याला एक्जिमा नावाचा आजार झाल्याचं समोर आलं.
8 / 10
डॉक्टरांकडे गेल्यावर रॉबिन्सनचे अनेक टेस्ट करण्यात आले, त्यातून त्याला एक्जिमा नावाचा आजार झाल्याचं समोर आलं.
9 / 10
यानंतर रॉबिन्सनने कंपनीकडे बेकरी प्रोडक्ट बनवताना हातात ग्लोव्ज घालणे किंवा हाताला क्रिम लावण्याची परवानगी मागितली, पण कंपनीने ती मागणी अमान्य केली.
10 / 10
अखेर रॉबिन्सननं बेकर्स फूड अँड एलाइड वर्कर्स यूनियनसोबत मिळून कंपनीवर 50,000 यूरो म्हणजेच 43,81,495 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ही मागणी कंपनीला मान्य करावी लागली.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय