चीनला बनवायचंय 1 किलोमीटर लांब अंतराळयान, रिसर्च सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 07:09 PM2021-09-03T19:09:33+5:302021-09-03T19:13:30+5:30

China working on spaceship: इतकं मोठं यान अंतराळात पाठवणे कठीण काम असेल.

चीन प्रत्येक क्षेत्रात काहीतरी मोठे करण्यासाठी ओळखला जातो. मग तो रस्ता असो, चीनची भिंत, लोकसंख्या किंवा कोणतेही नवीन तंत्रज्ञान. आता चीन जगातील सर्वात मोठं रॉकेट बनवण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीन एक किलोमीटर लांब अंतराळयान तयार करण्याचा विचार करत आहे.

चीनच्या नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशनने (एनएनएसएफसी) आपल्या शास्त्रज्ञांना या संदर्भात संशोधन करण्यास सांगितले आहे. या फाउंडेशनला चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून निधी दिला जातो. या संशोधनाची एक छोटीशी झलक एनएनएसएफसीच्या एका अहवालात आढळली आहे.

फाउंडेशनने चिनी शास्त्रज्ञांना या क्षेत्रात संशोधन करण्यास सांगितले आहे. मात्र, वाहन हलके असावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, डिझाइन उत्तम आणि कमी किमतीत बनवावे, असंही शास्त्रज्ञांना सांगण्यात आलं आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे माजी तंत्रज्ञ मेसन पेक म्हणतात की, हे यान कोणत्याही कल्पनेपेक्षा कमी नसेल. कल्पना वाईट किंवा चुकीची नाही. पण चीन अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञान या दोघांना उत्तम प्रकारे एकत्र करू शकेल का हा प्रश्न आहे.

पेक सध्या कॉर्नवॉल विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की, एवढे मोठे स्पेसशिप बांधता येतं, परंतु ते तयार करण्यासाठी समान प्रमाणात उपकरणे, मानवी संसाधने आणि सर्वोत्तम शास्त्रज्ञांची आवश्यकता असेल.

मेसन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) फक्त 361 फूट रुंद आहे. ते बनवण्यासाठी 100 अब्ज डॉलर्स म्हणजेच 7.30 लाख कोटी रुपये लागले आहेत. आता कल्पना करा की यापेक्षा 10 पट मोठी वस्तू बनवण्यासाठी किती खर्च येईल.

दुसरी समस्या म्हणजे, यानाची रचना कशी असेल. ISS म्हणजेच स्पेस स्टेशनचे तुकडे करून जोडण्यात आलं आहे. पण, चीन एक किलोमीटर लांब यान तयार करत असल्यामुळे गोष्टी कठीण होऊ शकतात.

दुसरी समस्या म्हणजे यानाची रचना आणि रचना कशी असेल. ISS म्हणजेच स्पेस स्टेशनचे तुकडे करून जोडले गेले आहे. त्यात मानवांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे त्याचे वजनही वाढते.

मेसन म्हणाले की, यान बनवण्याचे तंत्रज्ञान, त्याची किंमत किती कमी आहे यावर अवलंबून असेल. पारंपारिक मार्ग म्हणजे पृथ्वीवर त्याचे भाग बनवणे आणि नंतर त्यांना अंतराळात घेऊन जोडणे. परंतु आज 3 डी प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे हे काम अधिक वेगाने करता येते.

हे यान बनवण्यासाठी अजून एक पद्धत आहे, पण ती सोपी नाही. एवढे मोठे यान बनवायचे असेल तर त्यासाठी चंद्रापासून धातूंची व्यवस्था करता येऊ शकते. पण, ही गोष्ट खूपअवघड आहे.

मेसन म्हणतात की, यान जितके मोठे असेल, तितक्या जास्त समस्या असतील. कारण हे यान हवेत उडत नाही, ते अंतराळात उडते. अंतराळात त्याच्या दिशेवर,डॉकिंगवर आणि प्रक्षेपणावर नियंत्रण ठेवणं अवघड जाऊ शकतं. ही गोष्ट अशक्य नाही, पण अवघड आहे.