शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; रुग्णसंख्येत वाढ झाल्याने चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 2:44 PM

1 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत.
2 / 12
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
3 / 12
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
4 / 12
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 जानेवारीनंतर एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.
5 / 12
नव्या रुग्णांमध्ये 73 केसेस या लोकल ट्रान्समिशनच्या आहेत. जेलिन प्रांतातील टोंगुआ शहरात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे बीजिंग आणि शांघाईमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळत आहे.
6 / 12
चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली.
7 / 12
कोरोना महामारीच्या फैलावाच्या प्रारंभीच्या काळात या रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. जिनयांतन रुग्णालयात २०२०च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.
8 / 12
पथकाने चीनच्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली व कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या रुग्णालयाला भेट दिली. हे पथक आगामी काही दिवसांत वुहानमधील अनेक ठिकाणांना भेटी देणार आहे. या पथकात पशुवैद्यक, विषाणू विज्ञान, खाद्य सुरक्षा व महामारी विशेषज्ञ सहभागी आहेत.
9 / 12
चीनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या पहिल्या रुग्णाचा उपचार हुबेई इंटिग्रेटेड चायनिज व वेस्टर्न मेंडिसीन हॉस्पिटलमध्ये करण्यात आला होता. येथे कोरोनाचा पहिला रुग्ण 27 डिसेंबर, 2019 रोजी समोर आला होता.
10 / 12
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर म्हटले आहे की, हे पथक रुग्णालये, हुनान सीफूड मार्केट, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, तसेच वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या प्रयोगशाळेला आणि कोरोना व्हायरसशी संबंधित ठिकाणांना भेटी देणार आहे.
11 / 12
तथापि, पथकाच्या दौऱ्याने व्हायरसच्या उत्पत्तीबाबत सविस्तर माहिती मिळणे कठीण आहे, असे समजले जात आहे. चीनच्या दौऱ्यावर आलेले पथक 14 दिवस क्वारंटाइन होते. तो कालावधी संपल्यानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. जिनयांतन रुग्णालयात 2020 च्या प्रारंभी रुग्णांवर उपचार केले जात होते.
12 / 12
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात आले असून काळजी घेतली जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन