कॅलिफोर्नियात भयावह वणवा, जंगल जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:16 IST2017-12-12T14:11:41+5:302017-12-12T14:16:18+5:30

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये भयावह वणवा पेटला आहे. सँटा बारबेरा या शहरात अक्षरशः राखेचा पाऊस पडतोय.

राज्यातल्या अनेक भागांवर धुराची दाट चादर निर्माण झाली आहे. यामुळे लाखो नागरिक त्रस्त झाले आहेत.

लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यामुळे हजारो लोकांनी इतर राज्यांमध्ये तात्पुरतं स्थलांतर केलंय.

आगीमुळे 930 चौरस किलोमीटरचं जंगल खाक झालंय.

गेले 10 दिवस हा वणवा पेटला आहे. पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग आणखी पेटतेय. हजारो अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करतायेत. पण आग लागलीये तो भूभाग इतका मोठा आहे, की अग्निशमन यंत्रणा तोकडी पडतेय.

टॅग्स :आगfire