घटस्फोटावरून पहिल्यांदाच बोलले बिल गेट्स, सांगितलं कोण आहे यासाठी जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 15:16 IST2021-07-16T15:05:10+5:302021-07-16T15:16:05+5:30

'ऑफ द रिकॉर्ड' प्रश्नोत्तर सत्रादम्यान सीएनबीसी होस्ट बेकी क्विक यांनी बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत आणि गेट्स फाउंडेशनच्या भविष्याबाबत प्रश्न विचारला.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Microsoft Founder Bill Gates) यांनी पत्नी मेलिंडा गेट्ससोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. त्यांनी या घटस्फोटासाठी स्वत:ला जबाबदार मानलं आहे.

गेल्या आठवड्यात एलन अॅन्ड कंपनी द्वारे आयोजित अब्जाधीशांसाठी आयोजित एका शिबिरात एका विशेष सत्रादरम्यान बिल गेट्स यांनी घटस्फोटावर भावनात्मक प्रतिक्रिया जाहीर केली.

DNA च्या एका रिपोर्टनुसार, अब्जाधीशांच्या या विशेष सत्रात सहभागी एका व्यक्तीने सांगितलं की, घटस्फोटावर बोलताना बिल गेट्स इमोशनल झाले होते. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी ४ मे २०२१ ला २७ वर्षाचा संसार मोडून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती.

'ऑफ द रिकॉर्ड' प्रश्नोत्तर सत्रादरम्यान सीएनबीसी होस्ट बेकी क्विक यांनी बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत आणि गेट्स फाउंडेशनच्या भविष्याबाबत प्रश्न विचारला.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, या सत्रात सहभागी व्यक्तीने सांगितलं की, या प्रश्नावर बिल गेट्स भावूक झाले होते आणि त्यांनी हे मान्य केलं की, घटस्फोट त्यांची चूक आहे. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.

सत्रात सहभागी व्यक्तीने सांगितलं की, 'बिल गेट्स यांनी आपल्या घटस्फोटाबाबत बोलताना 'अफेअर' शब्दाचा वापर करणं टाळलं. तेच एका दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, बिल गेट्स बोलताना फारच भावूक झाले होते.

सूत्रांनुसार, बेकी क्विक यांनी पीडोफाइल जेफरी एपस्टीनसोबत त्यांच्या कथित मैत्रीबाबत बिल गेट्स यांनी कोणताही प्रश्न विचारला नाही.

बिल गेट्स हे सगळं एलन अॅन्ड कंपनीचे माजी अध्यक्ष हर्ब एलन द्वारे आयोजित डीनर पार्टीदरम्यान बोलले. बिल गेट्स नंतर अब्जाधीश जेफ बेजोस, मार्क झुकरबर्ग आणि शेरिल सॅंडबर्ग यांच्यासोबतही बसले होते.

दरम्यान गेट्स यांच्या आत्मकथा लिहिणारे जेम्स वालेस यांच्यानुसार, बिल गेट्स कंपनीसाठी १७ तास काम करत होते. अनेकदा असं झालं होतं की, जेव्हा बिल गेट्स फ्री व्हायचे तेव्हा ते पार्टीचा प्लॅन करत होते. वालेस यांच्यानुसार, अशात बिल गेट्स त्यांच्या मित्रांसोबत ऑल न्यूड क्लबच्या डान्सर्सना पार्टीसाठी बोलवत होते.

James Wallace यांनी सांगितलं की, गेट्स स्वत: त्या तरूणींजवळ गेले आणि त्यांना तिथे घेऊन आले. हे स्पष्ट नाही की, ते स्वत: त्या तरूणींना पूलवर घेऊन गेले किंवा त्यांना सांगितलं की, त्यांना कुठे जाऊन आपली जादू चालवायची आहे.

Read in English