ऑस्ट्रेलिया आग: मायेची ऊब... सर्जरी होईपर्यंत पिल्लू आईला बिलगून होतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 20:34 IST2020-01-07T19:46:51+5:302020-01-07T20:34:21+5:30

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीत निसर्गाची प्रचंड हानी झाली. कोट्यवधी वन्यप्राणीही या आगीत मृत्युमुखी पडले आहेत. आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे.
साधारण 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये लाखो कांगारू अन् हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे.
एका गंभीर जखमी कोआला प्राण्याचा फोटो व्हायरल होत असून त्यामध्ये आपल्या आईला बिलगलेल्या कोआलाचं पिल्लू दिसत आहे.
अग्नितांडवामुळे भयभीत झालेल्या काओला मादीच्या पिल्लाने आईचे ऑपरेशन होईपर्यंत तिला सोडलेच नाही.
उपचार करतेवेळी डॉक्टरांनी त्या पिल्लाला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्याने आईला घट्ट सोडलेच नाही.