शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

B-2 bomber Pics: अमेरिकेच्या बी-२ स्टेल्थ बॉम्बरने इराणची उडवली झोप, जाणून घ्या त्याची खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:56 IST

1 / 5
अमेरिकेने बी-२ स्टेल्थ बॉम्बरच्या माध्यमातून जगाला आपली हवाई ताकद दाखवली. अमेरिकेने इराणच्या अनुस्थळांवर अचूक हल्लाबोल केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण अक्षरश: हादरला.
2 / 5
बी-२ स्टेल्थ बॉम्बर हे अमेरिकन हवाई दलातील एक अद्वितीय शस्त्र आहे, जे तीन दशकांपासून अमेरिकन स्टेल्थ तंत्रज्ञानाचा कणा आहे. बी-२ स्टेल्थ बॉम्बर एकाच वेळी ६ हजार नॉटिकल मैल अंतर कापू शकते.
3 / 5
हे विमान जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या विमानांपैकी एक आहे. बी-२ स्पिरिट हा एक अत्याधुनिक स्टेल्थ बॉम्बर आहे, जो रडार आणि इन्फ्रारेड डिटेक्शनला चकवण्यास सक्षम ठेवतो. हे नॉर्थ्रोप ग्रुमन नावाच्या कंपनीने बनवले आहे.
4 / 5
बी-२ स्टेल्थ बॉम्बर विमानाचे खासियत म्हणजे ते सहज ट्रॅक करता येत नाही. तसेच हे विमान खूप उंचीवर उडू शकते.
5 / 5
या विमानात पायलटसाठी एक मिनी रेफ्रिजरेटर देखील आहे. अमेरिकन हवाई दलाकडे सध्या अशी १९ विमाने आहेत. हे विमान ऑटोपायलट मोडमध्ये देखील उडवता येते.
टॅग्स :warयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल