अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:47 IST2025-06-04T16:37:54+5:302025-06-04T16:47:03+5:30

यून्किंग जियान आणि जुनयोंग लियू...ही दोन नावे सध्या अमेरिकेत चर्चेचा विषय बनली आहेत. ३३ वर्षीय जियान आणि ३४ वर्षीय लियू दोघेही चीनचे नागरिक आहेत. ज्यांच्यावर अमेरिकेत एक धोकादायक जंतूची तस्करी करण्याचा आरोप आहे. हे जंतू पिकांमध्ये रोग निर्माण करणारे आहेत.

या दोघांना षडयंत्र रचणे, अमेरिकेत तस्करी करणे, खोटे जबाब देणे आणि व्हिसा फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मंगळवारी अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटकडून जारी निवेदनात या दोन्ही चिनी नागरिकांनी अमेरिकेत फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम नावाच्या बुरशीजन्य जंतूची तस्करी करण्याचा आरोप आहे. ज्याला वैज्ञानिक कृषी दहशतवादाचे शस्त्र मानतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जियान आणि तिचा बॉयफ्रेंड लियू यांना कथितपणे त्यांच्या रिसर्चसाठी चिनी सरकारकडून फंडिग मिळत होती. लियू चिनी यूनिवर्सिटीत काम करत होता आणि तिथे तो फ्यूजेरियम गॅमिनीरम यावर रिसर्च करत होता.

तपासावेळी सुरुवातीला या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यानंतर गुन्हा कबूल केला. गॅमिनीरम डेट्रॉयट मेट्रोपॉलिटन विमानतळावरून अमेरिकेत आणण्यात येणार होते. ते मिशिगन यूनिवर्सिटीत लॅबमध्ये यावर रिसर्च करणार होते जिथे त्याची गर्लफ्रेंड जियान काम करत होती. हे दोघेही चीनच्या सत्ताधारी कम्यूनिस्ट पक्षाशी जोडलेले आहेत.

चिनी नागरिकाविरोधात दाखल दोषारोप पत्रानुसार, २७ जुलै २०२४ रोजी लियूने अमेरिकेत एन्ट्री घेतली. तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला. मी लवकरच परतणार असून चीनमध्ये लॅब सुरू करणार असल्याचे त्याने तिला सांगितले असं तपासात समोर आले.

माझ्याकडे काहीच सामान नसल्याचा दावा लियूने केला, परंतु तपासात त्याच्याकडून चिनी भाषेत एक नोट, फिल्टर पेपरचा गोल तुकडा ज्यावर गोलाकार आकृती बनली होती. चार प्लॅस्टिक थैली, ज्यात लाल रंगाच्या रोपट्यांची लहान लहान गुच्छ होते. हे सामान त्याच्या बॅगेत कसे आले हे त्याला माहिती नसल्याचे तो अधिकाऱ्यांना म्हणाला. परंतु नंतर धाक दाखवताच सत्य उलगडले.

लियूने जाणुनबुजून त्याच्या बॅगेत हे नमुने लपवले होते कारण तो ज्या गोष्टी घेऊन जात आहे त्यावर निर्बंध आहेत हे त्याला माहिती होते. नमुने टिशूच्या पाकिटात ठेवले होते जेणेकरून अमेरिकन अधिकारी ते शोधू शकत नाहीत आणि अमेरिकेत तो रिसर्च सुरू ठेवेल हे त्याने तपासात कबूल केले.

फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम काय आहे? - फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम एक बायोलॉजिकल रोगजनक म्हणजे एक जैविक जंतू आहे. हा सुक्ष्मजीव असून जो माणूस, प्राणी आणि पिकांसह अन्य सजीवांमध्ये रोग निर्माण करून त्यांना हानी पोहचवू शकतो. कृषी क्षेत्रात गहू, मका, ओट्ससारख्या पिकांना संक्रमित करू शकतो.

हा खतरनाक विषाणू आहे, जो पिंकावर रोगराई पसरवतो, त्यानंतर पिक विषारी होते, ते खाण्यासही योग्य नसते. मानव आणि प्राण्यांसाठी ते जीवघेणे ठरू शकते. जर फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम युक्त धान्य कुणी खाल्ले तर त्याला उलटी, यकृताचे नुकसान आणि प्रजनन समस्या उद्भवू शकतात.

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, जैविक घटकांचा वापर करून पिके नष्ट करण्यासाठी शेतींना शस्त्र बनवणे याला 'कृषी-दहशतवाद' म्हणतात. ज्या देशांची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याचा हेतू देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे, सामाजिक अशांतता पसरवणे, हा दहशतवाद पकडणे खूप आव्हानात्मक असते.