जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं, कानशिलात लगावली अन् अखेरीस गळा कापला; प्रसिद्ध कॉमेडियनची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:54 PM2021-07-28T13:54:52+5:302021-07-28T14:01:27+5:30

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकेने (America) २० वर्षांपासून तळ ठोकून असेलेले सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) कब्जा करण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानच्या(Afghanistan) प्रमुख भागावर कब्जा करत तालिबाननं(Taliban) त्याची क्रूरता दाखवण्याचं काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानने देशातील एका प्रसिद्ध कॉमेडियन नजर मोहम्मद(Nazar mohammad) उर्फ खासा जवान(Khasha Zwan)ची कंधार प्रांतात हत्या केली.

आता कट्टरपंथी संघटनेने हत्येपूर्वीचा अखेरचा व्हिडीओ जारी केला आहे. ज्यात दिसतं की, कॉमेडियन नजरला सर्वात आधी कानशिलात लगावत आहेत. युद्धग्रस्त भागात लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे नजर मोहम्मदला तालिबानी अतिरेक्यांनी घराबाहेर ओढत आणलं आणि त्यांची हत्या केली.

तालिबानी कंधार प्रांतात सरकारसाठी काम करणाऱ्या लोकांना शोधून शोधून त्यांची हत्या करत आहेत. प्रत्येक घरात जाऊन शोध सुरू आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नजर मोहम्मदची हत्याही घराच्या बाहेर ओढून आणत केली होती.

२३ जुलैला नजर मोहम्मदची हत्या केली. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या हत्येसाठी तालिबानला जबाबदार धरलं आहे. कट्टरपंथी मुस्लीम संघटननेने या हत्येत सहभागी असल्याचा नकार दिला. एएनआयनुसार कॉमेडियन याआधी कंधार पोलिसांसाठी काम केले होते.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं तालिबानी कट्टरपंथी कॉमेडियन नजर मोहम्मदला घराबाहेर ओढत आणत एका कारमध्ये बसवतात. तालिबानी अतिरेक्यांकडे हत्यारे असतात. त्यानंतर कॉमेडियन मोहम्मदला कानशिलात लगावत स्थानिक भाषेत काहीतरी सांगताना दिसतात.

मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानी कट्टरपंथ्यांनी कॉमेडियनला त्याच्या घरातून बाहेर काढलं आणि काही वेळ एका झाडाला बंधक बनवून ठेवलं होतं. त्यानंतर गळा कापून त्याची क्रूर हत्या केली. स्थानिक पोलिसांसाठी काम करणारे कॉमेडियन गळा कापलेल्या अवस्थेत जमीनवर खाली पडल्याचं दिसून येते.

यापूर्वी सीएनएनने सांगितले की, तालिबान सोहेल पारदिस नावाच्या एका अफगान ट्रांसलेटरचीही गळा कापून हत्या केली. हा ट्रांसलेटर अमेरिकन सैन्यासोबत काम करत होता. पारदिस हजारो अफगानी ट्रांसलेटर्समधील एक होता ज्याची तालिबानीकडून हत्या होण्याची भीती होती.

परदेशी शक्तींचा वापर करून तालिबानी यांनी देशात दहशत माजवण्यात सुरूवात केली आहे. अफगान गृह मंत्रालयाने सांगितले की, तालिबानने मागील आठवड्यात १०० पेक्षा जास्त नागरिकांची हत्या केली आहे. या हत्येचा बदला घेऊ असं अफगाणिस्तान म्हणालं आहे.

तालिबानने अफगानिस्तानच्या सीमेवरील अनेक पोस्टवर कब्जा केला आहे. नुकतेच तीन अब्ज पाकिस्तानी रुपये सापडल्याचे वृत्त आले होते. जास्त रक्तपात न करता अफगाणिस्तान कसे काय देश जिंकण्याची तयारी करत आहे, असा प्रश्न अमेरिकेच्या बड्या बड्या अधिकाऱ्यांसमोर पडला आहे.

अफगाणिस्तानचे अशरफ गनी सरकार सध्या काहीच पोस्टवर आपला ताबा ठेवून आहेत. इराण, पाकिस्तानच्या सीमेवरून 2.9 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तालिबानच्या ताब्यात यापैकी 0.9 अब्ज डॉलरचा व्यापार होणारी पोस्ट गेली आहेत. उरलेल्या पोस्टवर तालिबान कब्जा करण्यासाठी रणनिती आखत आहे.