जुलै महिन्यात मोठा जलप्रलय येणार; जपानी भविष्यवेत्त्याने जगाला हादरवून सोडले, एवढे देश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:20 IST2025-04-14T15:16:29+5:302025-04-14T15:20:45+5:30

जपानी बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रियो तात्सुकी यांनी जुलै २०२५ साठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जुलै महिन्यात पृथ्वीवर मोठा पूर येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

2025 च्या सुरुवातीला जगाने दोन मोठी संकटे पाहिली आहेत. एक म्हणजे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील भीषण आग आणि दुसरे म्हणजे काही दिवसांपूर्वीच म्यानमार, थायलंडला आलेला भूकंप. या नैसर्गिक संकटात अब्जावधींचे नुकसान झाले आहे, तसेच शेकडो लोकांचा जीव गेला आहे.

आधीच पृथ्वीच्या एका भागाला युद्धाने ग्रासलेले आहे. त्यात आता ट्रम्प यांनी टेरिफ वॉर सुरु करून जगात एक वेगळेच युद्ध छेडले आहे, ज्यामुळे महामंदीची सुरुवात होऊ शकते. अशातच जपानच्या प्रसिद्ध भविष्यवेत्त्याने जुलै महिन्यात पृथ्वीवर जलप्रलय येणार असल्याचे भाकीत करून अनेकांची झोप उडविली आहे.

जपानी बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या रियो तात्सुकी यांनी जुलै २०२५ साठी धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जुलै महिन्यात पृथ्वीवर मोठा पूर येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

जपान आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती, संकट येऊ शकते असे त्यांना वाटत आहे. ही एक मोठी त्सुनामी असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे.

धक्कादायक म्हणजे २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीपेक्षा ही लाट तिप्पट मोठी असण्याची शक्यता आहे. हा मोठा पूर अनेक गावे, शहरे उध्वस्त करण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

यामध्ये त्यांनी जपानसह काही देशांची नावे दिली आहेत. यामध्ये फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तैवान सारखे देश आहेत. या देशांत मोठा नाश ओढवेल असेही ते म्हणाले आहेत.

तात्सुकी यांना १९८० पासून नैसर्गिक संकटांसह अनेक गोष्टींची स्वप्ने पडतात. १९९९ मध्ये त्यांनी मी पाहिलेली स्वप्ने नावाचे पुस्तक लिहिले होते.

१९९१ मध्ये गायक फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि १९९५ मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंपासह त्यांनी केलेली अनेक भाकीते आतापर्यंत खरी ठरल्याचे सांगितले जाते.