Earth: पृथ्वीचे फिरणे एका सेकंदासाठी बंद झाल्यास काय होणार? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 04:32 PM2021-08-24T16:32:44+5:302021-08-24T16:36:48+5:30

Earth: पृथ्वीने एका सेकंदासाठी फिरणे बंद झाले तर काय होईल? या प्रश्नावर अमेरिकेतील प्रसिद्ध अॅस्ट्रोफिजिस्टनी आपले मत मांडले आहे.

पृथ्वी स्वत:भोवती फिरते आणि स्वत:भोवतीची एक प्रदक्षिण पृथ्वी २३ तास ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंदांमध्ये पूर्ण करते. त्यामुळे पृ्थ्वीच्या एका भागात दिवस आणि एका भागात रात्र असते, हे अनेकांना माहिती आहे. मात्र पृथ्वीने एका सेकंदासाठी फिरणे बंद झाले तर काय होईल? या प्रश्नावर अमेरिकेतील प्रसिद्ध अॅस्ट्रोफिजिस्टनी आपले मत मांडले आहे.

अमेरिकेचे अॅस्ट्रोफिजिस्ट नील टायसन यांनी याबाबत टीव्ही आणि रेडियो पर्सनॅलिटी लेरी किंग यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यात टायसन यांनी सांगितले की, जर पृथ्वीने एका सेकंदासाठी जरी स्वत:भोवती फिरणे थांबवले तरी पृथ्वीवरील परिस्थिती अत्यंत भयानक होईल. आम्ही सर्वजण पृथ्वीसोबत पूर्व दिशेला फिरत आहोत. तसेच पृथ्वीने फिरणे थांबवल्यास परिस्थिती भयावह होईल.

त्यांनी सांगितले की, पृथ्वी ८०० मैल प्रति तास वेगाने स्वत:भोवती फिरत आहे. तसेच आपण सर्वजण पृथ्वीसोबत फिरत आहोत. आपण पृथ्वीसोबत फिरतोय याची माहिती आपल्याला नसते. मात्र पृथ्वी स्व:भोवती फिरायचे थांबल्यास सर्वजण आपले प्राण गमावू शकतात.

त्यांनी पुढे सांगितले की, पृथ्वी एक सेकंद जरी फिरायची थांबली तरी लोक उसळून खिडक्यांवरून खाली पडतील. हे चित्र खूप भयानक असेल. एखाद्या भरधाव कारचा अपघात झाल्यावर लोक जसे उसळून बाहेर फेकले जातात तसे तसे सर्वजण फेकले जातील.

टायसन हे आधीच आपल्या ट्विटमुळे खूप चर्चेत राहिले आहेत. त्यांनी अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांच्या संपत्तीबाबत विधान केले होते. त्यात ते म्हणाले होते की, त्यांच्या २०० बिलियन डॉलरच्या संपत्तीच्या माध्यमातून पृथ्वीला १८० वेळा प्रदक्षिणा घालता येईल. एवढेच नाही तर पृथ्वीवरून चंद्रावर ३० वेळा ये जा करता येईल.

त्यांनी प्रसिद्ध व्यावसायिक रिचर्ड ब्रेनसन यांच्याबाबतही एक दावा केला होता. रिचर्ड ब्रेनसन यांनी अंतराळ यात्रा केलेली नाही. ते सर्व जण सब ऑर्बिटलमध्ये गेले होते. नासाने ६० वर्षांपूर्वी एलन शेफर्ड नावाच्या प्रवाशाला या ठिकाणी पाठवले होते. हे अंतराळ नाही. मात्र जर तुम्ही त्याला अंतराळ म्हणत असाल तर माझी काहीच हरकत नाही.

ते पुढे म्हणाले की, रिचर्ड हे जिथपर्यंत पोहोचले आहेत, तिथपर्यंत सर्वसामान्य माणूस पोहोचू शकलेला नाही. मला वाटते की, ते जिकते लांब गेले होते. तिथून पृथ्वीचा चांगला व्ह्यू मिळू शकतो. मात्र त्याला अंतराळ म्हणजे चुकीचे ठरेल.

टायसन हे ९ वर्षांचे असताना अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे ते गेले होते. तिथून त्यांच्या मनात खगोलशास्त्राबाबत गोडी निर्माण झाली. त्यानंतर टायसन यांनी १९८० मध्ये हार्वर्ड विद्यापीठामधून पदवी घेतली आणि सन १९८३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून अॅस्ट्रॉनॉमीमध्ये मास्टर्सची पदवी घेतली.