शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Afghanistan Taliban Crisis: वीस वर्षे तालिबानला आव्हान देणारे अफगाणी नेते आहेत कुठे? त्यांचं झालं काय; समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 5:09 PM

1 / 7
अफगाणिस्तानवर तालिबानचा संपूर्णपणे कब्जा झाला आहे. तालिबानविरोधात जाणाऱ्या सर्व लोगांना एकतर मारण्यात आले आहे किंवा त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले आहे. मात्र २००१ नंतर तालिबानला आव्हान देणारे अनेक अफगाणी नेते तालिबानच्या हातावर तुरी देऊन निसटले आहेत. यातील अनेक नेत्यांनी शेजारच्या देशांमध्ये आसरा घेतला असून, त्यांनी तालिबानविरोधात नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामधील काही नेते पुढीलप्रमाणे आहेत.
2 / 7
६७ वर्षीय अब्दुल रशीद दोस्तम हे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती राहिले होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमधून तालिबानचे उच्चाटन करण्यात दोस्तम यांनी अमेरिकेला खूप मदत केली होती. त्यांना मजार ए शरीफचा म्हातारा सिंह म्हणूनही ओळखले जाते. सध्या ते उझबेकिस्तानमध्ये आहेत.
3 / 7
१९७९ मध्ये रशियाने आक्रमण केल्यावर अता मोहम्मद नूर यांनी रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी लोकांना तयार केले होते. १९९६ मध्ये तालिबान सत्तेत आल्यावर त्यांनी तालिबानविरोधात एक संयुक्त आघाडी ऊघडली होती. २००४ ते २०१८ या काळाता ते बल्ख प्रांताचे गव्हर्नर होते. मात्र तालिबानने बल्खवर कब्जा केल्यानंतर ते गायब झाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये पळून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
4 / 7
अहमद मसूद हे तालिबानविरोधी नेते अहमद शा मसूद यांचे मुलगे आहेत. त्यांनी १९८० मध्ये रशियन सैन्याचा प्रभावीपणे मुकाबला केला होता. तसेच तालिबानचा उदय झाल्यावर त्यांच्याविरोधातही त्यांनी आघाडी उघडली होती. दरम्यान, पंजशीर प्रांतात तालिबानचा अद्याप कब्जा झालेला नाही. मात्र पंजशीरमधील नेत्यांनी सरेंडर केल्याचे वृत्त आले आहे.
5 / 7
अमरुल्ला सालेह अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आहेत. रविवारी तालिबानने काबुलवर कब्जा केला तेव्हा त्यांनी राष्ट्रपती अश्रफ घनी यांच्यासोबत देश सोडल्याचे वृत्त आले होते. मात्र त्यांनी ते देशात असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या अमरुल्ला सालेह हे पंजशीरमध्ये आहेत. पंजशीरमधील नेते अहमद मसूद यांच्यासोबत त्यांच्या बैठका सुरू असून, ते तालिबानविरोधात लढण्यासाठी रणनीती आखत असल्याचे वृत्त आहे,
6 / 7
सलिमा यांचा जन्म १९८० मध्ये इराणमध्ये एक निर्वासित म्हणून झाला होता. तिथेच त्यांचे शिक्षण झाले होते. नंतर त्या अफगाणिस्तानमध्ये आल्या होत्या. त्या बल्ख प्रांतातील चारकिंटी जिल्ह्याच्या गव्हर्नर राहिल्या होत्या. सलिमा आणि तालिबान यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. तालिबानचा सामना करण्यासाठी त्यांनी स्वत:ची फौज तयार केलेली आहे. त्यामध्ये ६०० सैनिक आहेत. मात्र सध्या सलिमा कुठे आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. त्या इराणला गेल्या असाव्यात आणि तिथूनच त्या फौजेला ऑपरेट करत असाव्यात, असे सांगण्यात येत आहे.
7 / 7
इस्माइल खान यांना हेरातचा सिंह या नावाने ओळखले जाते. ते हेरातचे गव्हर्नर राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून ते तालिबानविरोधात लढत होते. मात्र तालिबानने त्यांना पकडले. सध्या तालिबानने त्यांना घरीच नजरकैदेत ठेवल्याचे वृत्त आहे. २००१ मध्ये तालिबानचा पाडाव करण्यासाठी अमेरिकेला त्यांचीच मदत घ्यावी लागली होती. इस्माइल खान हे भारताचे चांगले मित्र असल्याचे मानले जाते.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPoliticsराजकारणTerrorismदहशतवाद