By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 08:35 IST
1 / 10संतोष जाधव...एक असा युवक ज्याने कौटुंबिक सोने चांदी व्यवसाय सोडून शेतीकडे वळला. ऑर्गेनिक शेतीसोबत इंडियन फार्मर नावाने युट्यूब चॅनेल सुरू करून त्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना शिकवले. आज संतोष वर्षाला २५ लाखांची कमाई करतो. 2 / 10संतोष हा १२ वी नापास आहे. संतोषने जेव्हा कौटुंबिक व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला तो त्याच्या कुटुंबासाठी धक्कादायक होता. परंतु वेळेसोबत त्याने सर्वांना चुकीचे ठरवले. संतोष जाधव याला मिळालेल्या यशाबाबत आणखी जाणून घेऊया..3 / 10२०१२ साली संतोष जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या गावी परतला होता. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सोने चांदीचा व्यापार करते. मात्र संतोषने हा व्यवसाय सोडून पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. संतोषचा हा निर्णय कुटुंबासाठी खूप मोठा होता. त्याच्या कुटुंबाने आणि नातेवाईकांनी हा निर्णय न घेण्याबाबत त्याला सतर्कही केले. परंतु संतोषने शेतीचा मार्ग निवडला.4 / 10कुटुंबाच्या व्यवसायामुळे संतोष उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे ४-५ वर्षे राहिला. २०१५ मध्ये तो गावी परतला तेव्हा त्याने शेतीला करिअर म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. त्याला नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करायचा होता आणि शेतीत नवीन पद्धती राबवायच्या होत्या. सुरुवातीला त्याला कुटुंबाकडून विरोध सहन करावा लागला.5 / 10संतोषने २०१२ ते २०१६ या काळात महाराष्ट्रात बाइक दौरा केला. त्यात त्याने यशस्वी शेतकऱ्यांची भेट घेतली. यात बहुतांश शेतकरी दुसऱ्याचे अनुकरण करत होते, त्याशिवाय जुन्या परंपरांचे पालन करत होते. कारण या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची कमतरता होती. त्यावेळी इंटरनेटवर व्यावहारिक शेतीची माहिती मिळवणे फारसं प्रचलित नव्हते.6 / 10संतोषने त्याचा बालमित्र आकाश जाधवसोबत मिळून २०१८ साली इंडियन फार्मर नावाने युट्यूब चॅनेल सुरू केले. आकाश मॅकेनिकल इंजिनिअर होता. युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोप्या भाषेत आधुनिक तंत्रज्ञान शिकवायचे हा संतोषचा प्लॅन होता. आज संतोष आणि आकाश यांनी सुरु केलेल्या चॅनेलचे ११ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 7 / 10ते जैविक शेतीच्या माध्यमातून वर्षाला २५ लाख रूपये कमाई करतात. संतोष आता शेतात ड्रोनचा वापर करून अवघ्या १० मिनिटांत एक एकर जमिनीवर फवारणी करतात. मात्र पूर्वी याच कामासाठी एका मजुराला ५ तास वेळ लागायचा. संतोष सकाळी शेतात काम करायचा, दुपारी व्हिडिओ बनवायचा आणि रात्री तो एडिट करून दुसऱ्या दिवशी पोस्ट करत होता. 8 / 10संतोष जाधवला लहानपणापासून शेतीची आवड होती. त्याने त्याच्या आजोबासोबत बराच काळ शेतीत घालवला होता. परंतु शेतीपासून काही दूर होत त्यांच्या कुटुंबाने सोने चांदी व्यवसायात गेले होते. आता संतोष वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर शेती करतात. 9 / 10संतोष याने अर्धा एकर जमिनीवर पॉलिहाऊस बनवले आहे. त्याशिवाय वर्षभर पीक घेण्यासाठी त्याने त्याच्या जमिनीचे धोरणात्मक विभाजन केले आहे. तीन एकर उसासाठी, १.५ एकर द्राक्षे निर्यात करण्यासाठी, दोन एकर हंगामी टोमॅटोसाठी, एक एकर शिमला मिरचीसाठी आणि एक एकर काकडीसाठी दिले आहे. तीन ते चार एकर रिकामे किंवा आलटून पालटून ठेवले आहेत.10 / 10आज इंडियन फार्मर यूट्यूब चॅनेल दरमहा २ लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे. शिवाय दरमहा सरासरी ६०,००० सबस्क्राइबर्स त्यांचे वाढत आहेत. म्हणजेच येत्या काळात हे उत्पन्न झपाट्याने वाढेल. इंडियन फार्मर यूट्यूब चॅनेल दोन मार्गाने पैसे कमावते. गुगल अॅडसेन्स जाहिरात आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग. संतोष काही अॅग्रीटेक कंपन्यांच्या उत्पादनांचे आणि सेवांचे मार्केटिंग करतो.