जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 11:02 AM2020-07-05T11:02:56+5:302020-07-05T11:22:50+5:30

जगभरात कोरोना व्हायरसची माहामारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऐस्ट्राजेनेका ही ब्रिटिश स्वीडिश कंपनी ऐस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीसोबत कोरोनाची लस विकसीत करत आहे. प्रीक्लिनिकल टेस्ट आणि त्यानंतरच्या दोन टप्प्यातील लसीचे परिणाम सकारात्मक आले असून ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार केली जाऊ शकते.

मॉडर्ना ही अमेरिकेतील कंपनी लस तयार करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. जुलैमध्ये या लसीची तिसरी चाचणी केली जाणार आहे. या कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या सुरूवातीला कोरोना व्हायरसची लस दाखल होऊ शकते.

जर्मन कंपनी बायोऐंटेक आणि अमेरिकी कंपनी फाइजर तसंच चीनी कंपनी फोसुन फार्मा ही लस विकसित करणार आहे. ही लस ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते.

अमेरिकेतील नोवावॅक्सन कंपनीसुद्धा लसीवर काम करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या लसीचे परिक्षण सुरू आहे. या आंतराराष्ट्रीय प्रकल्पासाठी 38.4 कोटी डॉलरर्सचा खर्च करण्यात येणार आहे.

एंजेस- जापानी कंपनी एंजेस ओसाका तकारा बायो या कंपनीसोबत लस तयार करत असून लस आता तिसऱ्या टप्प्यात आहे.

आयसीएमआरने जारी केलेल्या पत्रानुसार, ७ जुलैपासून मानवी चाचण्यांसाठी इनरोलमेंट सुरु होईल. यानंतर, जर सर्व चाचण्या योग्य झाल्या असतील तर १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सिन लाँच केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी भारत बायोटेकची लस बाजारात येऊ शकते.

सिनोफार्म मिल वुहान इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स आणि चीनची सरकारी कंपनी सिनोफार्मचे या लसीवर काम सुरू आहे. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण लवकरच सुरू होणार आहे.

सिनोवॅक- चीनची खाजगी कंपनी सिनोवॅक लसीच्या परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. ही कंपनी दहा कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

चाइनीज एकॅडमी- चाइनीज एकॅडमी ऑफ मेडिकल साइंसेजच्या इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीमध्ये लसीवर परिक्षण सुरू आहे. पोलियो आणि हेपेटाइटिस ए च्या लसीसाठीसाठी या कंपनीची ओळख आहे.

लंडनच्या इंम्पेरिअल कॉलेजमधील संशोधक लसींवर परिक्षण करत आहेत. त्यासाठी एक्विटी ग्लोबल हेल्थ या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण आता सुरू होणार आहे.