By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 17:13 IST
1 / 10महिलांनी निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. असे अनेक आजार आहेत जे स्त्रियांवर लवकर अटॅक करतात. अशाच गंभीर आजारांबाबत जाणून घेऊया...2 / 10आरोग्य उत्तम ठेवणं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असलं तरी कुटुंबाची काळजी घेताना स्त्रिया आपल्या आरोग्याबाबत थोड्या बेफिकीर झाल्याचं अनेकदा दिसून येतं. मात्र, महिलांचं आरोग्य पुरुषांच्या तुलनेत अधिक कॉम्प्लिकेटेड असतं.3 / 10ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांना होणारा सर्वात मोठा आणि गंभीर आजार आहे. भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक म्हणजे 25 टक्के प्रकरणांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो. 4 / 10ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी वयाच्या तीसव्या वर्षांनंतर महिलांनी वर्षातून किमान दोनदा मॅमोग्राफी टेस्ट करणंआवश्यक आहे. तसेच आरोग्याची नीट काळजी देखील घ्यावी.5 / 10एनिमिया हा सामान्य आजार असला तरी हा आजार पुरुषांपेक्षा महिलांनाही जास्त होतो. एनिमियामध्ये शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते आणि रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांनी घेरले जाते. 6 / 10कौटुंबिक आणि करिअरच्या व्यस्ततेत महिलांना स्वत:ची विशेष काळजी घेता येत नसल्याने आणि योग्य आहार न घेतल्याने अनेकदा महिला याला बळी ठरतात. हे टाळण्यासाठी टेस्ट करणं आवश्यक आहे जेणेकरून शरीरातील हिमोग्लोबिनची नेमकी स्थिती कळू शकेल.7 / 10महिलांना अनेकदा व्हजिनायटिसचा त्रास होतो. या आजारात योनीमार्गात संसर्ग होतो आणि त्यामुळे खाज येणे, जळजळ होते. बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि स्वच्छतेच्या अभावासोबतच लैंगिक संक्रमित आजारांमुळे व्हजिनायटिस होण्याचा धोकाही वाढतो.8 / 10सर्व्हाइकल कॅन्सर देखील महिलांमध्ये सर्वात सामान्य आजारांपैकी एक मानला जातो. लेसेंटने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की जगभरातील सर्व्हाइकल कॅन्सरचं पाचपैकी एक प्रकरण भारतातील आहे.9 / 10झपाट्याने वाढलेले वजन देखील अनेकदा महिलांसाठी त्रासाचे कारण बनते. अशी प्रकरणे भारतात अनेकदा दिसून आली आहेत जिथे महिला त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात आणि वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. 10 / 10लठ्ठपणा पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्रास देत असला तरी, अलीकडील काही रिसर्चमध्ये तीस ते चाळीस वर्षांनंतर स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचं समोर आलं आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.