वॅक्सीन घेतल्यावर काही लोक होताहेत ताप आणि डोकेदुखीचे शिकार, तर काहींना काहीच होत नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:44 PM2021-06-16T13:44:56+5:302021-06-16T13:57:14+5:30

सर्वांना हे माहीत आहे की, वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स सर्वांनाच एकसारखे दिसतात असंही नाही. काही लोक कमी आजारी पडतात तर काही जास्त पडतात.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट कंट्रोल करण्यासाठी वॅक्सीनेशन बरंच फायद्याचं ठरत आहे. आता दिवसेंदिवस कोरोनाच्या केसेस कमी होत आहेत. याने हे स्पष्ट होतं की कोविड विरोधात वॅक्सीनेशन बरंच प्रभावी ठरलं आहे. अर्थातच वॅक्सीन घेतल्यावर काही लोकांना याचे साइड-इफेक्ट्स दिसतात. पण वॅक्सीन जास्त फायदेशीर आहे.

Times Of India च्या एका रिपोर्टनुसार, वॅक्सीनचा डोस घेतल्यावर काही लोकांमद्ये सामान्य लक्षणे तर काहींमध्ये गंभीर लक्षणे दिसतात. जास्तीत जास्त लोकांना हे स्पष्ट झालं आहे की वॅक्सीन घेतल्यावर ही स्थिती होते. सर्वांना हे माहीत आहे की, वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स सर्वांनाच एकसारखे दिसतात असंही नाही. काही लोक कमी आजारी पडतात तर काही जास्त पडतात. पण काही लोक असेही असतात ज्यांना वॅक्सीन घेतल्यावर साइड इफेक्ट्स दिसत नाही. अखेर डोस घेणाऱ्या लोकांमध्ये अशी वेगवेगळी लक्षणे का दिसतात?

कोविड वॅक्सीन घेतल्यावर लोकांमध्ये साइड इफेक्ट्स हे शरीर बाहेरील अॅंटीजनच्या संपर्कात आल्यावर दिसतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्याप्रकारे आपलं इम्यून सिस्टीम व्हायरसच्या एन्ट्री करताना प्रतिक्रिया करतं. ठीक त्याचप्रमाणे वॅक्सीनचा डोज घेतल्यावरही होतं. जे साइड इफेक्ट्सच्या रूपात दिसतात.

एंटीजेनच्या संपर्कात येताच आपलं इम्यून सिस्टीम लगेच अॅक्टिव होतं आणि रिस्पॉन्स करू लागतं. या प्रोसेसमध्ये आपलं इम्यून सिस्टीम व्हायरससोबत लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी आणि डिफेंसिव्ह अॅंटीबॉडी पाठवतं.

इम्यून सिस्टीमद्वारे कोरोन इन्फेक्शन विरोधात इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स करताच वॅक्सीनचा डोज घेणाऱ्या व्यक्तींना ताप, थकवा, मांसपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी लागणे इत्यादी लक्षणे दिसतात. अशाप्रकारच्या लक्षणांना कोविड वॅक्सीन घेतल्यावर सामान्य साइड इफेक्ट्स म्हटलं जातं.

साइड इफेक्ट्स वॅक्सीन आणि त्यांच्या शरीरावर अवलंबून असतात. ही लक्षणे सर्वांमध्ये सारखी दिसत नाहीत. असंही होऊ शकतं की, दोन वेगवेगळ्या वॅक्सीनच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिसू शकतात. उदाहरणार्थ कोवॅक्सीन घेतलेल्यांना कोविशिल्डच्या तुलनेत कमी साइड इफेक्ट्स दिसतात.

त्यामुळे सर्वांमध्ये एकसारखे साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत. व्यक्तीची इम्यून सिस्टीम कशाप्रकारे रिस्पॉन्स देते यावर हे अवलंबून असतं. फायजरच्या एमआरएनए वॅक्सीन रिसर्चमध्ये क्लीनिकल ट्रायलमध्ये आढळून आलं की, ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी डोज घेतल्यावर कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स न झाल्याचं सांगितलं. त्या लोकांना अजूनही काही त्रास झालेला नाही.

तज्ज्ञांनुसार, वय, लिंग, आधी असलेली इम्यूनिटी, आरोग्य समस्या, अॅंटी इन्फ्लेमेटरी टॅबलेटचं सेवन अशीही काही वॅक्सीनचे साइड इफेक्ट्सची कारणे असू शकतात. हेच कारण आहे की, वयोवृद्धांच्या तुलनेत तरूणांमध्ये वॅक्सीनचे जास्त साइड इफेक्ट्स रेकॉर्ड केले जात आहेत.

काही आकडेवारीनुसार पुरूषांच्या तुलनेत महिलांना कोरोना वॅक्सीनच्या साइड इफेक्ट्सचा जास्त त्रास होत आहे. यातून हे स्पष्ट होतं की, वॅक्सीन लिंगाच्या आधारावरही पुरूष आणि महिलांमध्ये वेगवेगळे दुष्परिणाम दाखवते. महिलांमध्ये जास्त साइड इफेक्ट्सचं कारण हार्मोनल इंटरफेरेंस हेही असू शकतं.

तर तुम्हाला वॅक्सीन घेतल्यावर कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स दिसले नाही तर याचा अर्थ असा होत नाही की, वॅक्सीन प्रभावी ठरली नाही. अनेक तज्ज्ञांनुसार, साइड इफेक्ट्स न दिसणं चिंतेचा विषय नाही. असंही होऊ शकतं की, व्यक्तीला पहिल्या डोजनंतर साइड इफेक्ट्स दिसले नसतील, पण दुसऱ्या डोजवेळी ते दिसू शकतात.

Read in English