चिंताजनक! कोरोना महामारीमध्ये आणखी एका महामारीचा धोका, WHO कडून भीषण नुकसानाचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:36 PM
1 / 7 WHO कडून सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस महामारीचा अप्रत्यक्ष प्रभाव सर्वात जास्त महिला, लहान मुले आणि तरूणांवर पडू शकतो. 2 / 7 WHO चे प्रमुख टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, कोरोनाच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे या खास समुहावर जो वाईट प्रभाव पडेल, तो कोविड-19 व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षाही भयावह असू शकतो. 3 / 7 टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, अनेक ठिकाणी महामारीमुळे हेल्थ सिस्टीमवर दबाव वाढला आहे. त्यामुळे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीशी संबंधित समस्यांमुळे महिलांच्या मृत्युचा धोका वाढू शकतो. 4 / 7 यूनायटेड नेशन्स पाप्युलेशन फंडच्या एग्झिक्युटीव्ह डायरेक्टर नतालिया कनेम यांवर सांगितले की, 'महामारीच्या आता आणखी एक महामारी निर्माण झाली आहे. 5 / 7 नतालिया कनेम म्हणाल्या की, एका अंदाजानुसार, दर 6 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे 4.7 कोटी महिला कंट्रोसेप्शन सुविधा गमावतील. त्यामुळे 6 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख बाळांचा जन्म होईल. 6 / 7 इंटर पार्लियामेंट्री यूनियनचे प्रेसिडेन्ट ग्रॅब्रिएला कुवस बॅरन म्हणाले की, महामारीमुळे 4 ते 6 कोटी बालकांवर भीषण गरीबीचा धोका निर्माण झालाय. जगातल्या अनेक देशांमध्ये महामारीमुळे शाळा अनेक महिने बंद आहेत. (Image Credit : forbes.com) 7 / 7 जगात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 76.5 लाखपेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. तर 4.25 लाख लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे. अशात ही नवीन माहिती चिंता वाढवणारी आहे. आणखी वाचा