कोणाला ये‌ऊ शकतो हार्ट अटॅक? एआय सांगणार, डेटाबेसच्या अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:18 IST2023-11-09T12:51:12+5:302023-11-09T13:18:43+5:30

heart attack : एआयच्या मदतीने हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या २५,००० लोकांच्या डेटाबेसचा अभ्यास

लंडन : गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच आता एआयच्या मदतीने हार्ट अटॅक रोखता येणार आहेत.

हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असलेल्या व्यक्तींना एआयच्या मदतीने शोधता येणार आहे.

पॅरिस कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च सेंटरचे प्रोफेसर झेवियर जॅवेन यांनी माहिती दिली आहे.

जॅवेन म्हणाले की, संशोधनादरम्यान एआयच्या मदतीने हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या २५,००० लोकांच्या डेटाबेसचा अभ्यास करण्यात आला.

त्यानंतर ही माहिती ७०,००० सामान्य व्यक्तींच्या डेटाबेसशी जोडण्यात आली.

यातून २५,००० अशी समीकरण तयार करण्यात आली, ज्याचा उपयोग हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.

जगातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हार्ट अटॅकने होतात. हार्ट अटॅकचा अंदाज लावणे कठीण आहे.

दरम्यान, या संशोधनातील विश्लेषणाच्या मदतीने हार्ट अटॅकचा धोका कमी होईल.