शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुरूषांनी केसगळती रोखण्यासाठी कोणत्या तेलाने मालिश करावी? जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:05 IST

1 / 9
पुरूषांना अलिकडे केसगळतीची मोठी समस्या बघायला मिळते. याची कारणे वेगवेगळी असतात. लोक ही समस्या दूर करण्यासाठी अनेक उपायही करतात. त्यावर पैसेही खर्च करतात. पण तुम्हाला माहीत असेल की, खूप आधीपासून केसांची तेलाने मसाज केली जाते. हा एक चांगला उपाय मानला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कोणत्या तेलाने केसांची मालिश करावी.
2 / 9
मोहरीचं तेल केसांसाठी फार फायदेशीर मानलं जातं. याने केसगळती थांबते सोबतच केसांची वाढ होण्यासही मदत होते. पण अनेकांना केसांना मोहरीचं तेल लावण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. आम्ही ही पद्धत सांगणार आहोत.
3 / 9
एक्सपर्ट सांगतात की, आठवड्यातून दोन दिवसही मोहरीच्या तेलाने मालिश केली तरी फायदा होतो. मोहरीचं तेल लावण्याआधी त्यात दोन ते तीन लसणाच्या कळ्या टाकून तेल गरम करावे.
4 / 9
तेल थंड झालं की, त्यात लिंबू मिश्रित करा आणि केसांच्या मुळात चांगल्याप्रकारे लावा. लांब केसांना बोटांच्या मदतीने हळूहळू तेल लावा. यावेळी नखे वाढलेले नसावेत नाही तर डोक्याच्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते.
5 / 9
मोहरीचं तेल मालिश करण्यासाठी खूप आधीपासून वापरलं जातं. आयुर्वेदानुसार, मोहरीच्या तेलाचा वापर केसगळती थांबवण्यासाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये हीना मेहंदीची पाने शिजवून हे मिश्रण लावल्याने केस मजबूत होतात.
6 / 9
केसांना तेल लावल्यावर कमीत कमी 3 ते 4 तास तसेच राहू द्या. त्यानंतर शॅम्पूने केस चांगले धुवा. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा ही प्रक्रिया रिपीट करा. काही दिवसातच याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल.
7 / 9
मोहरीच्या तेलाने केसातील कोंडाही दूर होतो आणि केसगळती थांबते. यात बीटा कॅरोटीन, फॅटी अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम आढळतात. याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
8 / 9
मोहरीच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-मायक्रोबियल गुण आढळतात. याने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळत आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच केस लांब होण्यासही याने मदत होते.
9 / 9
तसेच अनेकांना दाढीचे केस गळण्याचीही समस्या असते. अशात मोहरीचं तेल फायदेशीर ठरतं. या तेलाने दाढीच्या केसांची मालिश कराल तर केसगळती थांबेल. दाढीच्या केसांवर या तेलाने हळूवार मालिश करा.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स