शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खाद्यपदार्थांच्या पॅकेट्समधून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका किती? WHO नं दिलं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 2:51 PM

1 / 9
खाद्यपदार्थ किंवा खाद्यपदार्थांच्या पाकिटांतून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. लोकांनी खाद्यपदार्थांतून लागण होईल, अशी भीती वाटून घेऊ नये, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे.
2 / 9
लोकांनी अन्न वितरण किंवा प्रोसेस फूडचे पॅकेट वापरण्यास घाबरू नये, असे डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रयान यांनी म्हटले आहे.
3 / 9
याशिवाय, डब्ल्यूएचओच्या महामारी तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखोव्हे यांनी सांगितले की, चीनने कोट्यवधी पॅकेटची तपासणी केली आहे आणि फारच कमी सकारात्मक प्रकरणे आढळली आहेत, जी 10 पेक्षा कमी आहेत.
4 / 9
चीनमधील दोन शहरांमध्ये ब्राझीलमधून आयात केलेल्या फ्रोजेन चिकनची तपासणी केली असता विषाणूची पुष्टी झाल्याचे चीनचे म्हणणे आहे. याशिवाय, इक्वाडोरहून आलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवरही विषाणू आढळून आले.
5 / 9
याआधी, जगभरातील तज्ज्ञांनी असे म्हटले होते की, कोरोना विषाणू देखील हवेत असू शकतो. त्यानंतर डब्ल्यूएचओने सुद्धा मान्य केले होते की, कोरोना विषाणूचे कणही हवेत असू शकतात.
6 / 9
दरम्यान, जगभरात आतापर्यंत कोरोना-संक्रमित लोकांची संख्या 2 कोटी 13 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच, 7 लाख 63 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यूही कोरोनामुळे झाला आहे.
7 / 9
दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 25 लाखांच्या वर गेला आहे.
8 / 9
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (15 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65,002 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 996 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 25,26,193 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,036 वर पोहोचला आहे.
9 / 9
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,68,220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 18,08,937 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाInternationalआंतरराष्ट्रीयfoodअन्न