शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:53 PM

1 / 10
जर तुम्ही विचार करत असाल की कोरोना व्हायरसचा उद्रेक संपला आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. अर्थात त्याची तीव्रता कमी झाली आहे पण हा व्हायरस पूर्णपणे नष्ट झालेला नाही आणि होणार नाही. अनेक रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे.
2 / 10
कोरोना व्हायरस त्याचे स्वरूप बदलून आक्रमण करत आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला पिरोला असंही म्हणतात. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने कोरोनाचा नवीन व्हेरिएंट BA.2.86 ची पुष्टी केली आहे.
3 / 10
फारशी प्रकरणे आढळून आली नसली तरी या महिन्यात 19 ऑगस्टला 7 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर दोन्ही संस्था त्यावर देखरेख करत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, अमेरिका, डेन्मार्क, इस्रायल आणि यूकेसह अनेक अनेक देशांमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे.
4 / 10
BA.2.86 हा पिरोला म्हणूनही ओळखला जात आहे. हा व्हायरसचा एक नवीन वंश आहे ज्यामुळे कोरोना होतो. ग्लोबल जीनोम सिक्वेन्सिंग डेटाबेस तयार करणारी संस्था GISAID नुसार, BA.2.86 मध्ये 30 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत, जे सध्या प्रसारित होत असलेल्या इतर प्रकारांपेक्षा जास्त आहे.
5 / 10
WHO ने देखील याला सर्वाधिक म्युटेशन असलेला व्हायरस मानला आहे. चिंतेचा विषय हा आहे की या म्युटेशन प्रसार दर जास्त असू शकतो. डेन्मार्क, इस्रायल, अमेरिका आणि यूके या चार देशांमध्ये पिरोला सापडला आहे.
6 / 10
BA.2.86 ची काही प्रकरणे गेल्या आठवड्यातच नोंदवली गेली आहेत. यामुळे प्रभावित झालेल्या वृद्ध व्यक्तीमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली, ज्यासाठी त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती.
7 / 10
ओमायक्रॉन, अल्फा आणि डेल्टा इत्यादी कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा BA.2.86 पूर्णपणे भिन्न आहे. असे सांगितले जात आहे की हा व्हायरस 30 हून अधिक म्युटेशन्ससह आला आहे आणि ही चिंतेची बाब आहे की त्याचे म्य़ुटेशन किती गंभीर असू शकतात किंवा त्यांचा प्रसार किती असू शकतो याची कोणालाही माहिती नाही.
8 / 10
असेही मानले जाते की त्यात अँटीबॉडीज, लस किंवा बूस्टरपासून मिळणाऱ्या इम्युनिटीला चकमा देण्याची ताकद आहे. हा व्हायरस फक्त एका देशात आढळला नाही तर हा व्हायरस आधीच अनेक देशांमध्ये पसरला आहे.
9 / 10
BA.2.86 खूप नवीन आहे, त्याची लक्षणे इतर प्रकारांपेक्षा वेगळी किंवा अधिक गंभीर असू शकतात हे अद्याप माहित नाहीसीडीसी सल्ला देते की सुरक्षित राहण्यासाठी काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. त्याची लक्षणं सध्याच्या प्रकारासारखीच आहेत.
10 / 10
नाक गळणं, डोकेदुखी, थकवा, शिंका येणं, घसा खवखवणं, खोकला, वास घेण्याची क्षमता कमी होणं ही लक्षणं आहेत. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली तर तुम्ही प्रथम चाचणी करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस