डिजिटल गोंधळात मन शांत ठेवा! एकाग्रता वाढवण्यासाठी हे ५ उपाय नक्की करून बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:01 IST2025-10-27T13:46:36+5:302025-10-27T14:01:35+5:30

मन ही अशी संपत्ती आहे जी योग्य वापरली तर तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते. पण आजच्या काळात हेच मन सतत ताण, नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे अपडेट्स, कामाचा दबाव आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांच्या ओझ्याखाली थकलेलं असतं.

मनाचं रक्षण करणं म्हणजे अधिकाधिक कामं करणं नाही, तर जे मन थकवतात ते कमी करणं आणि जे तुम्हाला एकाग्रता, शांतता आणि ऊर्जा देतात ते वाढवणं होय. मन उत्साही ठेवण्यासाठी हे ५ उपाय तुमच्या मदतीला येऊ शकतात.

डिजिटल सीमा आखा : आज सतत वाजणारी मोबाइल नोटिफिकेशन्स, ई-मेल्स आणि मेसेजेस. प्रत्येक नोटिफिकेशन बघणं म्हणजे तुमची ऊर्जा हळूहळू संपवणं. (उपाय - दिवसात ठराविक वेळ "नो-स्क्रीन" म्हणून ठेवा. उदाहरणार्थ - सकाळी उठल्यावर १ तास आणि झोपण्याआधी १ तास मोबाइलपासून दूर राहा)

विचार लिहून ठेवा : आपल्या मनात रोज अनेक विचार, चिंता आणि कल्पना येतात. ते मनातच ठेवल्यास गोंधळ वाढतो. न लिहिलेले विचार मनावर भार बनून राहतात. (उपाय -डायरीत किंवा नोटबुकमध्ये चिंता, कल्पना आणि कामांच्या नोंदी करा. एकदा लिहून ठेवलं की ते मनातून उतरून कागदावर जातं. त्यामुळे मन हलकं होतं)

छोट्या ध्यानसाधना : ध्यान म्हणजे तासभर बसणं नाही. फक्त २-५ मिनिटांचा श्वासावर लक्ष केंद्रित करणारा थांबा सुद्धा तुमचं मन ताजं करू शकतो. (उपाय-कामाच्या मधे डोळे मिटून ५ खोल श्वास घ्या, किंवा एखादं लहानसं रिलॅक्सेशन अॅप वापरा. हे छोटं ब्रेक्स तुमचा ताण कमी करतात.)

कामांचं प्राधान्य ठरवा : एकाचवेळी सगळं करण्याचा प्रयत्न केला तर थकवा आणि निराशा येते. मनाला स्पष्ट दिशा नसेल तर ऊर्जा वाया जाते. (उपाय-दिवसाच्या सुरुवातीला फक्त १-२ महत्त्वाच्या गोष्टी निवडा आणि त्या पूर्ण करा. बाकीचं दुय्यम काम नंतर करा.)