टूथब्रश ते हेअर ब्रेश, आजारी पडायचं नसेल तर या रोजच्या वापरायच्या वस्तू कधी बदलायच्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:59 AM2020-03-10T10:59:00+5:302020-03-10T11:12:10+5:30

तुम्ही टूथब्रश बदलण्याआधी त्याचे ब्रिसल्स म्हणजे ब्रशची दातं खराब होण्याची वाटत बघता का? तुम्ही वर्षानुवर्षे एकच कंगवा वापरता का? भांडी घासायचा ब्रश किती वर्ष झाले बदलला नाही? हे प्रश्न आम्ही विचारतोय कारण या डेली वापरल्या जाणाऱ्या वस्तू वेळोवेळी बदलल्या नाही तर यांपासून तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. याने वेगवेगळ्या आजारांचे तुम्ही शिकार होऊ शकता

खाण्या-पिण्याच्या वस्तूंसोबत दररोज वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंचा देखील आपल्या आरोग्यावर थेट प्रभाव पडतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण घरातील या वस्तूंचा तुम्ही कळत-नकळत वर्षानुवर्षे वापर करत असाल आणि याकडे गंभीरतेने बघत नसाल तर तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहोत ज्या खराब होण्याची वाट पाहण्याऐवजी वेळीच बदलायला हव्यात. (Image Credit : nbcnews.com)

१) ३ ते ४ महिन्यांनी बदला ब्रश - ब्रशमध्ये एक कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात हे तुम्हाला माहीत आहे का? अनेकांना हे माहीत नसतं. याच कारणाने ब्रश लगेच बदलणं गरजेचं आहे. अनेकजण ब्रशचे दाते खराब होण्याची वाट बघतात. तुम्हीही असं करत असाल तर तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे अमेरिकन डेंटल असोसिएशनने ब्रश दर ३ ते ४ महिन्यांनी बदलण्यास सांगितले आहे. तसेच ब्रश चांगला स्वच्छ करणंही गरजेचं आहे.

२) दर सहा महिन्यांनी बदला कंगवा - टूथब्रश तरी अनेकजण वेळोवेळी बदलतात, पण कंगवा अनेक वर्ष एकच वापरतात. प्रत्येकाचा आपला एक आवडता कंगवा असतो. तो अनेक वर्ष वापरला जातो. तोच तोच कंगवा वापरला तर दिसेल की, त्यात केस, धुळ आणि तेल जमा झालेलं असतं. एक्सपर्ट्स सांगतात की, हेअर ब्रश किंवा कंगवा नियमितपणे स्वच्छ करावा. सोबतच दर ६ महिन्यांनी कंगवा बदलावा.

३) भांडी घासायचा स्पंज - घरात काही अशा वस्तू असतात ज्यांबाबत अजिबात रिस्क घेता येत नाही. जसे की, भांडी घासायचा स्पंज. ज्याप्रमाणे ब्रश बदलण्यासाठी दाते खराब होण्याची वाट बघू नये, तसेच भांडी घासायचा स्पंज बदलण्यासाठीही त्याची खराब होण्याची वाट बघू नये. हा स्पंज २ ते ४ आठवड्यांनी बदलला पाहिजे. कारण अन्न स्पंजमध्ये अडकतं आणि त्यात बॅक्टेरिया जमा होतात

४) किचनमधील चॉपिंग बोर्ड - स्पंजनंतर किचनमधील आणखी एक वस्तू जे नियमित बदलायला पाहिजे ती म्हणजे चॉपिंग बोर्ड. चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर भलेही तुम्ही चांगला स्वच्छ करत असाल, पण त्यात बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. यानेच तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे दर ३ महिन्यांनी चॉपिंग बोर्ड बदलायला हवा.

६) ३ महिन्यात बदला मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर - जास्तीत जास्त मुलींना पिंपल्स होण्याची समस्या फारच असते. त्याचं कारण असतं त्यांचे मेकअप प्रॉडक्टस आणि मेकअप टूल्स. जर तुमचा मेकअफ ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर खराब झालं असेल किंवा अनेक दिवस स्वच्छ केलं नसेल तर त्यात बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट्स, ब्रश नियमित बदलावे.

७) दर १ वर्षांनी बदला ब्रा - होऊ शकतं की, तुमची ब्रेस्ट साइज वर्षानुवर्षे एकच राहील आणि चांगले वापरले म्हणून ब्रा खराबही झाल्या नसतील तर त्याच वापरत असाल तर हे चुकीचं ठरेल. कारण एका ठराविक वेळेनंतर ब्रा बदलणे गरजेचे आहे. नियमित वापराने आणि धुतल्याने ब्रा ची इलॅस्टिसिटी संपते, ब्रा स्ट्रेच होऊ लागते आणि त्यांचा शेपही बिघडतो. त्यामुळे ते ब्रेस्टला व्यवस्थित सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे चांगले असले तरी ब्रा किमान १ वर्षाने बदलावे.