हिवाळ्यात सतत आजारी पडत असाल तर.... या टीप्स तुमच्यासाठीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:59 PM2019-11-29T13:59:35+5:302019-11-29T14:32:39+5:30

कोणताही ऋतु सुरू झाला की वेगवेगळे आजार मान वर काढतात. तसंच आता हिवाळा सुरू झाला आहे. आणि हिवाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार सतत होत असतात. या लहान लहान आजारांचं रुपांतर मोठ्या आणि जीवघेण्या आजारात होत. हे सगळं होण्याआधी जर काही गोष्टींची काळजी घेतली तर आरोग्यासंबंधी या समस्या उद्भवणार नाहीत. (Image credit-Travel fashion girl)

हिवाळ्यात सगळ्यांनाच फिरायला जायला आवडत असतं. पण सतत होणाऱ्या आरोग्यासंबंधी समस्यांमुळे आपण मनमोकळेपणाने फिरु शकत नाही. आज काही अश्या टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला अश्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.(Image credit-Lands end)

हिवाळ्यात वातावरणामुळे ब्लड प्रेशर वाढते. ब्लड प्रेशर वाढले तर रक्तदाब नियंत्रित राहत नाही. त्यामुळे हृद्याशी निगडीत असलेल्या आजारांचे प्रमाण वाढते. कारण वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण पडतो. हिवाळ्यात ब्लड प्रेशरचा त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात भूक जास्त लागत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये लक्षणीय वाढ होते. पचनाची क्रिया हिवाळ्यात वेगाने होत असल्यामुळे भुक लागण्याचे प्रमाण वाढते. व्यायामाअभावी या काळात तुमचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे थंडीत सकाळी उठून व्यायाम करायला हवा.

शरीरामध्ये ताकत आणण्यासाठी काजूचे सेवन करावे. प्रोटीन आणि वेगवेगळ्या विटामिन्स असलेला हा काजू हिवाळ्यात काम करायला ताकत देतात. पिस्ता कॉलेस्ट्रोल आणि हार्ट अटैक पासून वाचवितो

बऱ्याच लोकांना सांधेदुखीची समस्या असते. त्यांना हिवाळ्यात सांधेदुखीचा जास्त त्रास होतो. अशावेळी सांध्यांना तेलाने रोज मालिश करावी व त्यासोबत व्यायामही करावा. असे केल्यास सांधेदुखीला आराम मिळतो.

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ खूप कमी लोकं करतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते आणि अंघोळ झाल्यानंतर जास्त थंडी लागते. म्हणूनच जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने अंघोळ करा.