फुफ्फुसांसाठी वरदान आहेत 'हे' सुपरफुड्स! तुमची फुफ्फुसं राहतील फीट अँड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:42 PM2021-07-26T12:42:42+5:302021-07-26T13:59:11+5:30

फुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचं अवयव असून त्यांची निगा राखणे फार गरजेचे आहे.बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवाचे नुकसान करत असतो.मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवाचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.

तुमच्या फुफ्फुसांचे कार्य उत्तम राखण्यासाठी मुबलक पाण्याची गरज असते. रोज ८ ग्लास पाणी प्या. यामुळे फुफ्फुस स्वच्छ होतील आणि तुमचे आरोग्य सुधारेल.

.हळद-भारतीय व दक्षिण आशियायी भागात स्वयंपाकासाठी प्राचीन काळापासून हळद हा मसाल्याचा पदार्थ वापरण्यात येतो. हळद अँटीऑक्सिडंट,अँटीइन्फ्लेमेंटरी, अँटीबायोटिक व रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी असते. हळदीमध्ये असलेल्या क्युरुमिन (Curcumin) या घटकामुळे अति धुम्रपानामुळे फुफ्फुसांमध्ये साठणारा प्लॅग (Plaque) कमी होतो ज्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीरातील एन्झाइमची निर्मिती वाढते. या्मुळे फुफ्फुसांमधून संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात विशेषत: EGCG (epigallocatechin) म्हणून ओळखला जाणारा कॅटेचिन हा घटक असतो. यामध्ये फुफुसांना कॅन्सरच्या घटकांपासून संरक्षण देणारे घटक देखील असतात.

ब्रॉकोर्ली सारख्या भाज्या आहारात असल्यास शरीरातील ग्लुकोसिनॉलेट (Glucosinolate) निर्मितीत वाढते ज्याचा फायदा फुफ्फुसांमधील टॉक्सिन बाहेर टाकण्यास होतो.

लसणामधील अँटिइन्फेमेंटरी व इम्युन बिल्डींग प्रॉपर्टीजमुळे अस्थमा व फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

संत्री अथवा लाल रंगाच्या फळांमध्ये आढळणारे नारिंगी रंगाचे अँटिऑक्सिडन्ट पिगमेंट अथवा रंगद्रव्य फुफ्फुसांना होणा-या कर्करोगाचा धोका कमी करते.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे फुफ्फुसे निरोगी रहाण्यास मदत होते.यासाठी आहारात पालक,लेट्यूस,कोबी,मस्टर्ड ग्रीन,पातीचा कांदा,गव्हाकुंर,पुदिना व कोथिंबिरीची पाने यांचा समावेश करा.

आले हे देखील पचन व रक्ताभिसरणाला चालना देणारा एक पदार्थ आहे. आल्याचा फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी देखील फायदा होतो.

सफरचंदामध्ये पेक्टिन (Pectin),व्हिटॅमिन,फ्लेवोनॉइड व केमिकल घटक असतात. फ्लेवोनॉइड मुळे श्वसनव्यवस्था देखील निरोगी रहाते. फुफ्फुसांचे कार्य सुरळीत राहते.

Read in English

टॅग्स :आरोग्यHealth