अलर्ट! महिलांच्या 'या' 7 चुकीच्या सवयी ठरतील जीवघेण्या; होऊ शकतात हृदयासंबंधित आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:40 IST2022-03-17T17:29:18+5:302022-03-17T17:40:32+5:30
7 Common Mistakes : महिलांच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्याचा त्यांच्या हृदयावर मोठा परिणाम होतो आणि हे जीवावर बेतू शकतं हे जाणून घेऊया...

हार्ट अटॅक हा आजच्या काळातील सर्वात घातक आजारांपैकी एक आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण कमी आहे. बहुतेक स्त्रियांना मोनोपॉजनंतरच हृदयविकाराचा झटका येतो. म्हणजेच मोनोपॉजनंतर स्त्रियांना पुरुषांइतकाच हृदयविकाराचा धोका असतो.
मधुमेहासारखी समस्या असेल तर त्यात हार्मोनल फायदा होत नाही. एवढेच नाही तर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर महिलांच्या हृदयात आणि शरीरात अनेक गुंतागुंत निर्माण होतात.
महिलांकडून होणाऱ्या काही चुका मृत्यूचा धोकाही वाढवतात. महिलांच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्याचा त्यांच्या हृदयावर मोठा परिणाम होतो आणि हे जीवावर बेतू शकतं हे जाणून घेऊया...
स्मोकिंग करणं
पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतातील महिला कमी धूम्रपान करतात. पण जर आपण शहरी भागाबद्दल बोलायचं म्हटलं तर येथे महिलांसाठी धूम्रपान करणे खूप सामान्य बाब आहे. त्याचबरोबर हृदयविकाराची समस्या धूम्रपानाशी जोडलेली आहे.
तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका तर वाढतोच. पण ते फुफ्फुसाच्या आजाराचे कारण देखील बनू शकते. अशा परिस्थितीत या समस्या टाळण्यासाठी धूम्रपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे.
झोप पूर्ण न होणे
घरातील आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे स्त्रिया वेळेआधीच उठतात आणि रात्री झोपायलाही उशीर होतो. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप घेताच येत नाही. झोपेची कमतरता हृदयविकाराचा धोका वाढवते.
कमी झोपेमुळे तणावही निर्माण होतो. हृदयावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिलांनी त्यांच्या झोपेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि दिवसातून किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे.
जास्त स्ट्रेस घेणे
साधारणपणे प्रौढ व्यक्तीने दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. हीच गोष्ट स्त्रियांनाही लागू होते. तसेच तणावापासून दूर राहावे. तणावापासून दूर राहण्यासाठी योग, संगीत, व्यायाम इत्यादींचा अवलंब करू शकता.
लक्षणे दुर्लक्षित करणे
पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही हृदयविकाराची काही लक्षणे दिसून येतात. परंतु ते पुरुषांच्या लक्षणांपेक्षा वेगळी आहेत. सामान्यतः मळमळ, उलट्या, धाप लागणे आणि घाम येणे ही हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये गणली जाते.
सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे जे स्त्रियांमध्ये दिसत नाही. यामुळे, बहुतेक स्त्रिया उर्वरित लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी हृदयाचे मोठे नुकसान होते.
हेल्थ चेकअपला न जाणं
स्त्रिया अनेकदा आरोग्याची तपासणी करणं टाळतात हे तुम्ही तुमच्या घरातही पाहिलं असेल. महिलांच्या या सवयीमुळे त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
लक्षात ठेवा की कोणताही रोग टाळण्याचा किंवा त्यापासून बचावाचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही वेळोवेळी आरोग्याची तपासणी करत राहिलं पाहिजे. याद्वारे आपण रोगांना बळी पडणे टाळू शकता आणि रोगांपासून लवकर बरे देखील होऊ शकता.
वजन वाढणं
महिला अनेकदा त्यांच्या वजनाबाबत खूप बेफिकीर असतात. विशेषतः आई झाल्यानंतर. परंतु महिलांनी त्यांचे वजन मेंटेन राखणे महत्त्वाचे आहे. कारण बहुतेक हृदयाच्या समस्या वाढत्या वजनाशी संबंधित असतात. दररोज व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
एक्सरसाइज न करणे
ऑफिसच्या कामापासून घरातील कामांपर्यंत सगळ्याची जबाबदारी महिलांवर असते. अशा परिस्थितीत, बहुतेक महिलांना एक्सरसाइज रूटीन फॉलो करता येत नाही. ही एक वाईट सवय आहे.
तज्ज्ञांच्या मते, महिला किंवा पुरुष दोघांनीही आठवड्यातून किमान 5 दिवस तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)