सावधान! इम्यूनिटी वाढवणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतोय स्टोनचा धोका; वेळीच ६ पदार्थांचे सेवन टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 03:38 PM2020-12-14T15:38:38+5:302020-12-14T16:04:32+5:30

किडनी स्टोन अशी समस्या आहे. ज्याच्या वेदना खूप तीव्रतेने जाणवतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा मीठ आणि शरीरातील इतर खनिजे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्याचा आकार कधीही निश्चित नसतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्याा वेबसाईडवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मानवी शरीरात चार प्रकारचे स्टोन असू शकतात. त्यांना कॅल्शियम स्टोन, स्ट्रुवायट स्टोन, यूरिक एसिड स्टोन आणि सिस्टीन स्टोन असे म्हणतात. आपण जे काही खातो पितो यावर स्टोनची स्थिती अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबत सांगणार आहोत.

कोल्ड-ड्रिंक्स पासून लांब राहा- स्टोनचा त्रास असेल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण कोल्ड-ड्रिंक्स चे सेवन करणं धोकादायक ठरू शकतं. त्यात केमिकल्स आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.

व्हिटामीन सी- रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लोक आता व्हिटॅमिन सी किंवा लिंबूवर्गीय फळांकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले आहेत. कदाचित आपण विसरत आहात की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील स्टोनची समस्या निर्माण करू शकते. तसंच बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्सयुक्त फळांच्या रसाचे सेवन नुकसानकराक ठरू शकते.

ऑक्सलेट असलेल्या वस्तू कमी खा - स्टोनच्या बाबतीत डॉक्टर प्रथम ऑक्सलेट न खाण्याचा सल्ला देतात. पालक, काही धान्यं, क्रॅनबेरी, रताळे आणि चॉकलेट इत्यादींमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात आढळते. काही लोक टोमॅटो खाणं टाळा. पण टोमॅटोमध्ये फारच कमी प्रमाणात ऑक्सलेट आढळते.

जास्त सोडियम- जर तुमच्या अन्नात भरपूर सोडियम असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जंक फूड, पॅक फूड आणि जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळावे. बाहेरचे चिप्स, सूप, स्नॅक्स यांमध्ये जास्त प्रमाणात मीठाचा वापर केला जातो. म्हणून पॅकबंद पदार्थ खाऊ नका.

अ‍ॅनिमल प्रोटीन- प्राण्यांमधील प्रोटीन्स शरीरात कॅल्शियम ऑक्सलेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि यूरिक एसिड स्टोनचा धोका वाढवते. म्हणून, आपण आपल्या अन्नामध्ये प्राण्यांकडून मिळणारे प्रथिने कमी ठेवले पाहिजे. मांस, मासे ऐवजी दूध आणि चीजऐवजी शेंगदाणे, मसूर किंवा सोयाबीन पदार्थांपासून प्रोटिन्स मिळवणं हा एक चांगला पर्याय मानला जातो.

किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी डीटॉक्सिफिकेशन आवश्यक आहे. मूत्रपिंडाला नैसर्गिक मार्गाने डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा, डाळिंब आणि सफरचंदांचे व्हिनेगर यासारख्या गोष्टी फायदेशीर ठरतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घेऊन खाण्या पिण्यात पोषक पदार्थांचा समावेश करा. (Image Credit-arizona-urology)