शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus Vaccine : 'असं' डबल प्रोटेक्शन देत आहे ऑक्सफोर्डची कोरोना व्हायरस वॅक्सीन, वाचा कसं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 10:10 AM

1 / 13
इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीकडून अनेक संस्थांसोबत मिळून कोरोनाला नष्ट करणारी वॅक्सीन तयार केली जात आहे. या वॅक्सीनबाबत जगभरातील लोकांना फारच अपेक्षा आहेत. कारण इतर देशांमध्ये तयार होत असलेल्या वॅक्सीनच्या शर्यतीत ही वॅक्सीन पुढे आहे. या वॅक्सीनबाबत नुकतेच सकारात्मक रिझल्ट समोर आले आहेत.
2 / 13
ऑक्सफोर्डच्या वॅक्सीनचे आतापर्यंतचे रिझल्ट सकारात्मक येत आहेत. खास बाब ही आहे की, ज्या वॉलेंटिअर्सवर या वॅक्सीनची ट्रायल केली गेली. त्यातून समोर आले आहे की, ही वॅक्सीन मानवी शरीराला दोन प्रकारे लाभ पोहोचवत आहे.
3 / 13
या रिसर्चशी संबंधित वैज्ञानिकांनुसार, ज्या वॉलेंटिअर्सना वेगवेगळ्या ट्रायल्समध्ये ही वॅक्सीन दिली गेली, त्यात १८ ते ५५ वयोगटातील लोकांवर या वॅक्सीनचा प्रभाव दोन प्रकारे बघायला मिळाला आहे. पहिला हा की, या वॅक्सीनने त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडीज तयार होत आहेत.
4 / 13
दुसरा फायदा हा होत आहे की, ही वॅक्सीन दिल्यानंतर त्यांच्या शरीरात टी-सेल्स म्हणजे व्हाइट ब्लड सेल्सचा काउंट वाढलेला बघायला मिळाला. या पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरात रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचं काम करतात.
5 / 13
ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीने कोरोना नष्ट करणारी ही वॅक्सीन जेनर इन्स्टिटयूटसोबत मिळून तयार केली आहे. या वॅक्सीनचे दोन यशस्वी ह्यूमन ट्रायल झाल्या आहेत. याबाबत सायंटिफिक जर्नल लॅंसेटच्या ताज्या अंकात माहिती देण्यात आली आहे.
6 / 13
यात सांगण्यात आले आहे की, सुरूवातीच्या स्तरावर ह्यूमन ट्रायल दरम्यान या वॅक्सीनचे कोणतेही घातक साइड इफेक्ट समोर आलेले नाहीत.
7 / 13
ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी द्वारे तयार करण्यात आलेल्या या वॅक्सीनचं नाव ChAdOx1 nCoV-19 असं आहे. ही वॅक्सीन विकसित करण्यात यूके सरकारने पूर्णपणे मदत केली होती.
8 / 13
सोबतच या वॅक्सीनच्या डेव्हलपमेंटमध्ये मेडिकल फील्डशी संबंधित सर्व मदतीसाठी ब्रिटीश-स्विडिश मल्टीनॅशनल फार्मा कंपनी AstraZeneca ने मदत केली.
9 / 13
रिसर्च टीमचं मत आहे की, ही वॅक्सीन मनुष्याच्या शरीरात पोहोचल्यानंतर १४ दिवसांच्या आत टी-सेल्सचा निर्माण करते. टी-सेल्स कोरोना व्हायरसने संक्रमित सेल्स नष्ट करण्याचं काम करते.
10 / 13
तेच ही वॅक्सीन दिल्यानंतर केवळ २८ दिवसाच्या आत शरीरात कोरोना अॅंटीबॉडीज तयार होतात. अॅंटीबॉडीज कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्याचं काम करतात.
11 / 13
कोरोना व्हायरसच्या या वॅक्सीनबाबत इतक्या सकारात्मक गोष्टी वाचल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आता अजून या वॅक्सीनवर किती काम शिल्लक आहे.
12 / 13
तर याचं उत्तर हे आहे की, याप्रकारचे आकडे या वॅक्सीनच्या एनिमल ट्रायल दरम्यान आले होते, तसेच आकडे ह्यूमन ट्रायल दरम्यान आले आहेत.
13 / 13
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यादरम्यान ही वॅक्सीन मनुष्यावर पूर्णपणे सुरक्षित आढळून आली. याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. आता या परिणामांचा डेटा संबंधित संस्था आणि सरकारांना देण्यात येईल. नंतर परवानगी मिळाल्यावर याची निर्मिती सुरू होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय