Golden Blood: जगात केवळ ५० जणांकडेच ‘गोल्डन ब्लड’; फायदे-तोटे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:10 PM2022-01-21T18:10:11+5:302022-01-21T18:14:29+5:30

मानवी शरीरात असणाऱ्या रक्तगटाचे तुम्ही ८ प्रकार ऐकले असतील. परंतु त्याशिवाय एक दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे ज्याला गोल्डन ब्लड असं ओळखलं जातं.

रक्त गटात(Blood Group) मध्ये मुख्य ४ प्रकार असतात. ज्यात ए, बी, एबी आणि ओ याचा समावेश असतो. तुमचा ब्लड ग्रुप तुमच्या आई वडिलांकडून मिळालेल्या जीनवर निर्धारित असतो. ब्लड ग्रुपमध्ये RhD पॉझिटिव्ह आणि RhD निगेटिव्ह असं असतं. ज्याचा अर्थ एकूण ८ ब्लड ग्रुप आहेत.

परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल या ८ ब्लड ग्रुपशिवाय एक खास ब्लड ग्रुप असतो ज्याचं नाव गोल्डन ब्लड (Golden Blood) असं असतं. हे जगातली सर्वात दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे. जे केवळ आतापर्यंत ५० लोकांमध्येच आढळलं आहे.

रक्त हे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सचे प्लाझ्मा नावाच्या द्रवात बनलेले असते. तुमच्या रक्तगटाची ओळख अँटीबॉडीज आणि प्रतिजनांद्वारे केली जाते. अँटीबॉडीज हे प्लाझ्मामध्ये आढळणारे प्रोटीन आहेत.

ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संरक्षणाचा भाग आहेत. ते बाह्य पदार्थांना ओळखतात, जसे की सूक्ष्मजंतू आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती सतर्क करतात, ज्यामुळे त्यांचा नाश होतो. अँटिजन हे लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे प्रोटीन रेणू आहेत. गोल्डन ब्लड किंवा Rh null रक्तगटात लाल रक्तपेशी (RBC) वर कोणतेही Rh प्रतिजन (प्रोटीन) नसते.

हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मिळ असल्याने संशोधन करत असलेल्या वैज्ञानिकांनी याला गोल्डन ब्लड असं नाव दिलं आहे. दुर्मिळ असल्याकारणाने आणि कुणालाही देता येत असल्याने या ब्लड ग्रुपची किंमतही वाढते. गोल्डन ब्लड सुरुवातीला आदिवासी ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये आढळला होता.

गोल्डन ब्लड ग्रुपमध्ये एक चिंतेची बाब अशी की, त्यातील Rh नल कुणालाही दान करता येत नाही किंवा ते घेणंही शक्य नाही. जर आरएच नल व्यक्तीला रक्ताची गरज भासल्यास जगभरातील नियमित आरएच व्यक्तींकडूनच त्याला रक्त पुरवठा केला जाऊ शकतो.

हा जगातील दुर्मिळ रक्तगट आहे, जो केवळ ५० पेक्षा कमी लोकांमध्ये आढळतो. एका रिपोर्टनुसार, जगभरात या रक्तगटाचे केवळ नऊ सक्रिय रक्तदाते आहेत. यामुळेच हा जगातील सर्वात मौल्यवान रक्तगट आहे, म्हणून त्याला गोल्डन ब्लड असे नाव देण्यात आले आहे.

गोल्डन रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये सर्व आरएच एंटीजन नसतात तर आरएच निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये फक्त आरएचडी एंटीजन नसते. गोल्डन ब्लड हा अनुवांशिक म्युटेशनचा परिणाम आहे. हे सहसा RHAG जनुकाचे म्युटेशन असते, जे Rh शी संबंधित ग्लायकोप्रोटीनसाठी कोड असते.

आरएचएजी म्युटेशन बहुतेक वेळा अनुवांशिक स्टोमाटोसाइटोसिस नावाच्या आजाराशी संबंधित असते. अशा लोकांना कमी किंवा खूप काळ हेमोलाइटिक अॅनिमिया आणि RBC घट होण्याचं प्रमाण वाढू शकतो. Rh-null फेनोटाइपसुद्धा अशक्तपणाच्या बाबतीत एखाद्याच्या व्यक्तीत जन्मानंतर दिसू शकतो.

गोल्डन ब्लड असण्याचं कारण - कुटुंबातील विवाह (एक चुलत भाऊ अथवा बहीण, किंवा जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकांमधील विवाह), ऑटोसोमल जीन्स (रोगाची लक्षणे कारणीभूत असणारी असामान्य जीन्स कुटुंबांमधून जातात), आणि काही जनुकांमध्ये बदल किंवा पूर्ण नष्ट होणे, जे RHD आणि RHCE किंवा RHAG असतं.

गोल्डन ब्लड असलेल्यांना काय धोका? अशा लोकांना हेमोलाइटिक अॅनिमिया, हिमोग्लोबिन पातळी कमी होणे, शरीरात पिवळेपणा आणि थकवा, लाल रक्तपेशी कमी होणे इत्यादींचा धोका असतो. याशिवाय अशा लोकांना रक्त संक्रमणादरम्यान आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. जर आई आरएच नल असेल आणि बाळाचा आरएच-पॉझिटिव्ह रक्त गट असेल तर गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. अशा लोकांना सेप्सिस आणि किडनी निकामी होण्याचा धोकाही जास्त असतो.

गोल्डन ब्लड ग्रुप दान करता येईल का? होय, गोल्डन ब्लड दान केले जाऊ शकते. RBC वर एंटीजन नसल्यामुळे, Rh नल रक्त असलेल्या व्यक्तीला यूनिवर्सल डोनर मानले जाते आणि हे रक्त Rh प्रणालीमध्ये दुर्मिळ रक्तगट असलेल्या कोणालाही दान केले जाऊ शकते.