चिंताजनक! फायजरची कोरोना लस घेतल्यानं २९ जणांचा मृत्यू; सरकारच्या अडचणीत वाढ

By manali.bagul | Published: January 17, 2021 12:10 PM2021-01-17T12:10:15+5:302021-01-17T12:31:42+5:30

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. नॉर्वेमध्ये लसीकरणानंतर वाढणाऱ्या मृतांच्या संख्येनं सरकारच्या चिंतेत भर टाकली आहे. फायजर इंक कंपनीची लस दिल्यानंतर नॉर्वेमध्ये आतापर्यंत २९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता लोक लसीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. आकडेवारीनुसार आतापर्यंत नॉर्वेमध्ये लसीकरणानंतर ६ लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा आता २९ वर पोहोचला आहे.

या लसीमुळे जास्तीत जास्त वयस्कर लोकांचा मृत्यू होत आहे. ७५ ते ८० या वयोगटातील लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. ही लस कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सक्षम आहे की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.

नॉर्वेमध्ये जवळपास ४२ हजार लोकांना फायजर इंकचा कमीत कमी एक डोस देण्यात आला होता. त्यानंतर वयस्कर तसंच अन्य लोकांसाठीही धोकादायक असल्याचं समजलं जात आहे.

नॉर्वे मेडिसिन एजेंसीनं शनिवारी ब्लूमबर्गला दिलेल्या एका उत्तरात म्हटलं की, शुक्रवारी फक्त फायजर आणि बायोएनटेकद्वारे उत्पादित केलेली लस नॉर्वेमध्ये उपलब्ध होती आणि सगळी मृत्यूची प्रकरणं ही या लसींशी संबंधित आहेत.

रिपोर्ट्मध्ये समोर आलेल्या माहितीनुसार गंभीर आजार असलेल्या वयस्कर लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीच्या अपेक्षित परिणामांचा सामना केला आहे. यात उलटी, ताप या परिणामांचा समावेश आहे.

एलर्जी अधिकाऱ्याच्या रिपोर्टनुसार सरकारकडून माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यानी जवळपास १.९ मिलियन डोस सुरूवातीला मिळाल्यानंतर १४ ते २३ डिसेंबरपर्यंत गंभीर एलर्जीच्या प्रतिक्रियांबाबत २१ प्रकरणांची सुचना दिली आहे.

हा रिपोर्ट फायजर बायोएनटेक लसीच्या पहिल्या सुरक्षा रिपोर्टमध्ये प्रकाशित केला जाणार आहे.

या लसीमुळे वृद्धांचा मृत्यू झाल्याचे अजूनही निष्पन्न झालेले नाही. या प्रकरणानंतर युरोपमध्ये फायजरने लसींचा पुरवठा त्वरित कमी केला आहे.