Blood Sugar लेव्हल कंट्रोल करण्यासाठी 'या' आहेत सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:56 IST2019-07-24T16:51:14+5:302019-07-24T16:56:41+5:30

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना हे करावा लागतो. विशेषत: मधुमेह असलेल्या लोकांना जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया.
व्यायाम
व्यायाम करणं हे शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. वजन कमी करण्यासाठी तसेच इन्सुलिनच्या प्रमाणावर कंट्रोल ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. शुगर लेवल मेनटेन ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो.
फायबर
आहारात प्रामुख्याने फायबरचा समावेश करा. भाज्या आणि फळांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.
हायड्रेशन
दररोज योग्य प्रमाणात पाणी नक्की प्या. शरीर हायड्रेट असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
एकाच वेळी भरपूर खाऊ नका
काही जणांना एकाच वेळी खूप खाण्याची सवय असते. मात्र असं करू नका. थोड्या थोड्या वेळाने पदार्थ खा. यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहील.
स्ट्रेस
स्ट्रेस वाढला की त्याचा शरिरावर देखील परिणाम होतो. स्ट्रेसमुळे शरिरातील ग्लूकेगन आणि कॉर्टिसोल हॉर्मोन रिलीज होतात आणि शुगर लेवल देखील वाढते. त्यामुळे कामाचा अथवा इतर गोष्टींचा स्ट्रेस घेऊ नका.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.