खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

By manali.bagul | Published: September 24, 2020 11:37 AM2020-09-24T11:37:24+5:302020-09-24T11:53:12+5:30

गेल्या ७-८ महिन्यांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. प्रसिद्ध औषध तयार करणारी कंपनी जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीला या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी जवळपास ६० हजार लोकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. 'नॉट फॉर प्रॉफिट' या तत्वावर आधारित ही लस विकसीत केली जात आहे. लसीचे चाचणीदरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आल्यास २०२१ च्या सुरूवातीला लसीच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते.

जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसन कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही लस कितपत प्रभावी ठरेल हे डिसेंबर महिन्यात कळू शकेल. ही लस सर्दी, खोकल्याच्या एडेनोव्हायरसवर आधारीत असलेली सिंगल डोज लस आहे. या लसीत स्पाईक प्रोटीन्सचा सुद्धा समावेश आहे. या तंत्राचा वापर करून इबोलाची लस तयार करण्यात आली होती.

मॉडर्ना आणि एक्स्ट्राजेनेका या लसींचेही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. फायजर कंपनीही ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत लसीच्या चाचण्यांबाबत अधिक माहिती देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनच्या लसीबाबत दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लोकांना या लसीच्या चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.

. यामुळे देशासाठी चागलं काम करण्याची संधी मिळू शकते. या औषध कंपनीचे चेअरमन एलेक्स गोस्रर्की यांनी सांगितले की, कोरोनाच्या माहामारीला नष्ट करणं हेच आमचं उद्दीष्ट आहे.

याआधीही जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसन कंपनीनं कोरोनाची लस Ad26 प्राण्यांवर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले होते. NVX‑CoV2373 लसीची चाचणी १३० निरोगी लोकांवरही करण्यात आली होती. १८ ते ५९ वर्ष वयोगटातील लोकांचा या चाचणीत समावेश होता. ८३ स्वयंसेवकांना बुस्टर डोस तर २५ स्वयंसेवकांना नॉर्मल डोस देण्यात आले होते

'द न्‍यू इंग्‍लँड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार तज्ज्ञांनी ३५ साव्या दिवशी या माहितीचे विश्लेषण केले होते. अनेक स्वयंसेवकांवर लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते. एका स्वयंसेवकाला डोस दिल्यानंतर तीन दिवसांपर्यंत ताप आला होता. खूप कमी लोकांमध्ये या लसीचे नकारात्मक परिणाम दिसून आले होते.

या अभ्यासानुसार ज्या लोकांना बुस्टर डोस देण्यात आले होते. अशा स्वयंसेवकांमध्ये कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांच्या तुलनेत ४ ते ६ टक्क्यांनी अधिक एँटीबॉडी दिसून आल्या होत्या. बुस्टर डोसमुळे CD4+ T सेल्समध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला होता.

T सेल्स व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असतात. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही लस लिक्विड फॉर्म्‍युलेशनमध्ये २ डिग्री ते ८डिग्री तापमानात ठेवली जाऊ शकते.