तुमचा रक्तगट B+, O+ आहे का?; कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतील संशोधकांच्या रिपोर्टमधून नवी माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:33 IST2025-07-28T12:24:49+5:302025-07-28T12:33:10+5:30

आपण बऱ्याचदा लोकांच्या व्यक्तिमत्त्वावरून त्यांच्या बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करतो. प्रत्येकालाच आपला मेंदू तीक्ष्ण हवा असतो. आता कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतील संशोधकांनी याच गोष्टीचा शोध घेतला आहे. त्यामुळे तुमच्या ब्लड ग्रुपनुसार मेंदूच्या गतिमानतेचा अंदाज लावला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटले.
तज्ज्ञांनुसार, माणसाची पसंत-नापसंतीसोबतच ब्लड ग्रुपही त्याच्या वर्तवणुकीचे आणि मानसिक क्षमतेचे निगडीत असू शकतो. काही ठराविक रक्त गट असणारे लोक इतर लोकांपेक्षा अधिक हुशार शकतात जे आपल्या कामांत माहीर होतात.
तुमचा मेंदू इतरांपेक्षा वरचढ आहे का याची तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला रक्तगट तपासावा लागेल. कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतून जो रिसर्च समोर आला आहे. त्यातून नवी माहिती उघड झाली जी तुम्हाला हैराण करेल.
कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीत ६९ लोकांवर झालेल्या संशोधनाचा हा रिपोर्ट आश्चर्यकारक आहे. त्यात ब्लड ग्रुप B+ आणि O+ असणारे लोक इतर व्यक्तींपेक्षा बुद्धिमत्तेने चपळ असतात. या लोकांची विचार करण्याची आणि आकलन करण्याची क्षमता दुसऱ्यांपेक्षा वेगळी असते.
B+, O+ रक्तगट असणाऱ्या लोक त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि जलद विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांना कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे समजते असं या संशोधनातून पुढे आले आहे.
B+ ब्लड ग्रुपचा व्यक्ती कसा असतो? - रिसर्चनुसार, B+ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूत पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोब अधिक सक्रीय असतो. ज्यामुळे त्यांचा मेंदू मजबुतीने काम करू शकतो. त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा चांगली असते आणि ते मोठ्या आव्हानांनाही सहजपणे तोंड देतात. त्यांची एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता त्यांना खास बनवते.
O+ ब्लड ग्रुपचं वैशिष्टे काय? - O+ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये रक्ताभिसरण खूप चांगले असते असं कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतील संशोधनात आढळून आले आहे. त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह देखील खूप चांगला असतो, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. हे लोक सर्वात कठीण कामे देखील सहजपणे हाताळण्यात पटाईत असतात.
इतर रक्तगट असलेल्या लोकांची बुद्धिमत्ता कशी असते? - केवळ B+ आणि O+ रक्तगट असलेले लोकच बुद्धिमान असतील असे आवश्यक नाही. हा फक्त एका संशोधनाचा निष्कर्ष आहे. आपण असेही अनेक लोक पाहिले आहेत ज्यांचे रक्तगट वेगळे आहेत, परंतु ते बुद्धिमत्तेच्या बाबतीत कोणापेक्षाही कमी नाहीत.
कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीतील या रिपोर्टमुळे इतर रक्तगट असलेल्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता नसते असं गृहीत धरू नये. बुद्धिमत्ता ही एक मोठी गुणवत्ता आहे, जी केवळ रक्तगटावर नाही तर अनेक गोष्टींवर अवलंबून असते.