कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात 'असं' ठेवा, अन्यथा कोरोना राहील अन् भलत्याच आजारांना निमंत्रण द्याल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 11:14 AM2020-04-06T11:14:31+5:302020-04-06T12:20:35+5:30

सध्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव करता यावा यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशाच घरी बसून राहिल्यामुळे कोरोनापासून तर संरक्षण होईल पण लोकांना इतर समस्या उद्भवू शकतात.ज्यामुळे तुमचं कॉलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यातूनच हृदयाशी संबंधीत समस्या निर्माण होतात.

अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हार्टसंबंधीत समस्यांचा सामना जास्त करावा लागतो. शरीरातील कॉलेस्ट्रॉलच्या प्रमाणाकडे लक्ष न दिल्यास रक्ताच्या गाठी होणं, ब्लॉकेज, हार्ट संबंधित इतर आजार होण्याचा धोका जास्त असतो.

आपल्या शरीरात गुड कॉलेस्ट्रॉल आणि बॅड कॉलेस्ट्रॉल असे प्रकार असतात. शरीरात कॉलेस्टॉलचं प्रमाण नियंत्रित करणं गरजेचं आहे. शरीर चांगलं राहण्यासाठी कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण 200 mg/dL असायला हवं. बॉर्डर लाइन कोलेस्ट्रॉल 200 ते 239 mg/dL यांचामध्ये असायला हवी. हाय कॉलेस्ट्रॉल 240mg/dL असायला हवं. गुड कॉलेस्ट्रॉल स्ट्रोकसारख्या समस्यांना रोखण्यासाठी फायदेशीर ठरत असते.

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, जास्त थकवा येणं, अचानक हद्याचे थोके वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणं, पाय दुखणं या कारणांमुळे कॉलेस्ट्रॉल वाढतं.

लोक अनेकदा आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. जंक फुडचं अतिसेवन यांमुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यासाठी खूप जास्त फॅट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू नका. जे लोक जास्त आळशी असतात. शारीरिकदृष्ट्या फारसे एक्टिव्ह नसतात. अशा लोकांना कॉलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या उद्भवते.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. जर तुमचं वजन सतत वाढत जात असेल तर तुम्ही डाएटवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी मेदयुक्त पदार्थाचे सेवन करणं टाळा. संतुलित आहार घ्या, कमी तेलाच्या, कमी साखर, कमी मीठाच्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

रोज व्यायाम केल्याने आणि योगा केल्याने तुम्ही ताण- तणावमुक्त राहू शकता. त्यामुळे आजारांचा धोका टळेल

डॉक्टरांकडून नियमित कॉलेस्ट्रॉलची तपासणी करा. त्यासाठी एंटी-ऑक्सीडेंट, विटामिन-सी, मुबलक प्रमाणात असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.