सावधान! दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ; आरोग्यासाठी ठरू शकेल घातक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:55 IST2023-11-28T17:43:42+5:302023-11-28T17:55:42+5:30
दूध हे शरीरासाठी आरोग्यदायी असले तरी त्याच्यासोबत काही पदार्थांचे सेवन करणं टाळावं

5 foods to avoid with Milk: आयुर्वेदात खाण्या-पिण्याचे काही नियम आहेत आणि जर ते पाळले नाहीत, तर शरीराला अपाय होऊ शकतो. त्यातही आरोग्यदायी असे दूध काही गोष्टींसोबत सेवन केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. पाहा त्या ५ गोष्टी
दूध आणि मासे हे एक धोकादायक कॉम्बिनेशन आहे आणि डॉक्टरांचा असा विश्वास आहे की यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.
बरेच लोक दूधासोबत ब्रेड खातात. पण तज्ज्ञांच्या मते, दुधासह यीस्ट ब्रेड खाल्ल्याने पोटात अस्वस्थता आणि असंतुलन होऊ शकते.
दुधासोबत केळी खाणे हे बऱ्याच जणांचा नाश्ता असतो. पण या मिश्रणामुळे घशात कफ आणि अस्वस्थता येऊ शकते.
मुळा किंवा त्यासारख्या कंदमुळे व काही फळभाज्या दुधासोबत खाल्ल्याने त्या पचायला जड जातात आणि पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुधासोबत मांस सेवन करणे किवा हिरव्या पालेभाज्या सेवन करणे हेदेखील आरोग्याला घातक ठरू शकते