Fact check : कोरोना टेस्टसाठी स्वॅब स्टिक नाकात टाकल्याने खरंच 'ही' गंभीर समस्या होते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:28 PM2020-07-21T12:28:48+5:302021-01-27T13:29:07+5:30

मेंदूच्या आजूबाजूला वाहत रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड ब्रेन बॅरिअर असतो. अनेक थरांच्या कोशिकांपासून हे तयार झालेलं असतं.

नाकात स्वॅब स्टिक टाकून केली जाणारी कोरोना टेस्टबाबत एक बातमी व्हायरल झाली आहे. त्या असा कथित दावा केला गेलाय की, स्वॅब स्टिक मेंदूच्या blood brain barrier पर्यंत पोहोचून नुकसान पोहोचवते. अनेक देशांमध्ये अशी कथित शक्यतेची अफवा पसरली. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळं क्लिअर झालं.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही बाब व्हायरल झाली होती की, जेव्हा कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी स्वॅब स्टिक नाकात टाकली जाते, त्याने नुकसान होतं. कारण ती ब्लड ब्रेन बॅरिअरपर्यंत पोहोचते.

याबाबत सोशल मीडियात वेगवेगळ्या गोष्टी पसरत आहेत. पण अनेक संस्थांनी आणि तज्ज्ञांनी व्हायरल झालेला दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी फॅक्ट चेक करून हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलंय.

बीबीसीच्या एका रिपोर्टने जेव्हा जेव्हा याबाबत फॅक्ट चेक केलं तेव्हा असं आढळून आलं की, अशाप्रकारच्या शक्यतेला काहीच अर्थ नाही. स्वॅब स्टिकने कोणतंही नुकसान होत नाही.

अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये रॅपिड टेस्ट दरम्यान स्वॅब स्टिकचा वापर होतो. ज्याच्या वरच्या टोकावर कापसाचा बोळा लावलेला असतो.

तज्ज्ञांचं मत आहे की, मेंदूच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असते. सर्वातआधी तर मेंदू कवटीमध्ये सुरक्षित असतो. तसेच मेंदू काही तरल पदार्थांमध्ये आणि नसांमध्ये कैद असतो.

मेंदूच्या आजूबाजूला वाहत रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड ब्रेन बॅरिअर असतो. अनेक थरांच्या कोशिकांपासून हे तयार झालेलं असतं.

याचं काम रक्तातील अणूंना मेंदूत पोहोचण्यास रोखतो आणि ऑक्सिजनसहीत अन्य पोषक तत्वांना जाऊ देणं असतं. पण इथपर्यंत कोणत्याही प्रकारची नळी किंवा स्वॅब पोहोचणं फार कठिण आहे.

जर स्वॅब स्टिक नाकातून टाकली तर ब्लड ब्रेन बॅरिअरपर्यंत पोहचेपर्यंत अनेक थर पार करावे लागतील. उतकांमध्ये छिद्र करावे लागतील आणि एका हाडातून जावं लागेल जे सामान्य स्थितीत शक्य नाही.

अशी कोणतीही समस्या आतापर्यंत बघितली गेली नाही. नेजोफेरेंजिअल स्वॅब द्वारे कोरोना व्हायरस टेस्टिंगसाठी नाकाच्या मागच्या बाजूवरील नमूने घेतले जाते.

बीबीसीच्या रिपोर्टमध्ये लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनशी संबंधित टॉम विंगफील्डच्या हवाल्याने सांगण्यात आले की, नाकात कोणतीही वस्तू इतक्या आत जाणं जरा अजब आहे. स्वॅब सॅम्पल घेताना थोडी खाज किंवा गुदगुल्या होऊ शकते, पण वेदना होत नाही.