शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेहरा धुताना जास्तीत जास्त पुरूष करतात 'या' चुका, वाचा कशा टाळायच्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 11:15 AM

1 / 9
Face Washing Mistakes Mens Do: सामान्य पुरूष हे महिलांपेक्षा आपल्या चेहऱ्याची फार कमी काळजी घेतात. जास्तीत जास्त पुरूष आंघोळीच्या साबणानेच चेहरा धुतात. पण यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.
2 / 9
अशा बऱ्याच चुका असतात जे पुरूष तोंड धुवत असताना करतात. या चुका टाळून ते चेहरा चांगला ठेवू शकतात. चला जाणून घेऊ सामान्यपणे पुरूष चेहरा धुताना कोणत्या चुका करतात.
3 / 9
1) चेहरा गरम पाण्याने धुतात - बरेच लोक हिवाळ्यात गरम पाण्याने तोंड धुतात. असं करून ते त्यांच्या त्वचेवर अत्याचारच करतात. गरम पाण्याने चेहऱ्यावरील मुलायमपणा किंवा ओलावा कमी होतो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि त्वचाही कोरडी होते. गरम पाण्याऐवजी चेहरा धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं.
4 / 9
2) झोपण्याआधी चेहरा धुवत नाहीत - जवळपास सगळेच पुरूष असं करतात, जे त्वचेसाठी चांगलं नाही. यामुळे तुमची त्वचा निर्जीव होते. दिवसभर तुमच्या त्वचेवर धुळ आणि प्रदूषणाचे कण बसतात. ते स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यामुळे झोपण्याआधी चेहरा धुतला पाहिजे.
5 / 9
3) चेहरा एक्सफोलिएट न करणं - जर तुम्ही एक्सफोलिएट करत नसाल तर त्वचेवरील छोटे छोटे छिद्र साफ होत नाहीत. दिवसातून एकदा असं करणं गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर त्वचा निर्जीव होते आणि डेड स्किन सेल्सही वाढतात.
6 / 9
4) साबणाने चेहरा धुणे - जास्तीत जास्त पुरूष हे आंघोळीच्या साबणानेच आपला चेहरा धुतात. याने तुमच्या चेहऱ्याची त्वचा शुष्क होते आणि त्यावर थरही येतो. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी फेसवॉशचा वापर करा. याची निवड त्वचेच्या प्रकारानुसार करावी.
7 / 9
5) चुकीच्या पद्धतीने मसाज - फेस स्क्रब आणि फेसवॉशचा वापर करताना बरेच खालून वरच्या बाजूला मसाज करतात. जे चुकीचं आहे. याने त्वचा सैल होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी मसाज नेहमी वरून खालच्या दिशेने करावी.
8 / 9
6) टॉवेलने घासणे - चेहरा धुतल्यानंतर लोक टॉवेलने घासून घासून चेहरा पुसतात. असं करणं बरोबर नाही. याने त्वचेवर रॅशेज पडतात आणि त्वचा कोरडीही होते. अशात चेहरा धुतल्यानंतर हलक्या हाताने चेहरा पुसावा.
9 / 9
7) फेशिअल वाइप्सचा जास्त वापर - वाइप्सचा वापर करणं कधी कधी ठीक आहे. पण नेहमीच त्यांचा वापर करणं चुकीचं आहे. चेहरा पूर्ण स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचाच वापर करा.
टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीLifestyleलाइफस्टाइलHealth Tipsहेल्थ टिप्स