केवळ इमोशनल लोकांना करावा लागतो 'या' गंभीर समस्यांचा सामना, वेळीच करा उपाय नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:07 AM2020-03-16T11:07:44+5:302020-03-16T11:21:58+5:30

काही गुण हे आपल्यात जीनद्वारे येतात आणि काही गुण हे काळानुसार आणि परिस्थितीनुसार येतात. या दोन गोष्टींवरूनच आपला व्यवहार आणि विचार अवलंबून असतात.

तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं वाईट वाटतं का? किंवा तुम्ही कुणाला काही बोलण्याआधी त्याला वाईट वाटू नये म्हणून विचारात असता का? किंवा तुम्हाला असा एकादा मित्र आहे का, ज्याने केलेली छोटी गंमतही तुम्हाला त्रास देऊन जाते. मुळात ही सगळी लक्षणे अधिक संवेदनशील असण्याची आहेत.

सामान्यपणे एखादी व्यक्ती दोन कारणांमुळे अधिक सेन्सिटीव्ह असते. एक म्हणजे त्याचे जीन. म्हणजे तो जन्माने फार संवेदनशील आहे आणि निसर्गानेच त्याला कसं बनवलं आहे. दुसरं कारण म्हणजे व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या काही घटना किंवा परिस्थिती. (Image Credit : cigna.com)

काही गुण हे आपल्यात जीनद्वारे येतात आणि काही गुण हे काळानुसार आणि परिस्थितीनुसार येतात. या दोन गोष्टींवरूनच आपला व्यवहार आणि विचार अवलंबून असतात. यामुळेच एखादी व्यक्ती फार चिडचिड करणारी किंवा फार जास्त इमोशनल होते. इमोशन सर्वांनाच असतात, पण काही लोक दुसऱ्यांबाबत फार जास्त संवेदनशील असतात. (Image Credit : talentsmart.com)

जे लोक फार जास्त संवेदनशील असतात त्यांच्यात एखाद्या व्यक्तीकडून काही बोललं गेलं असेल तर त्याबाबत सतत प्रोसेस सुरू असते. हे लोक कोणत्याही स्थितीबाबत किंवा गोष्टीबाबत फार जास्त विचार करतात. ते सतत विचारांना वेढलेले असतात. याच कारणाने त्यांना एंग्जायटीची समस्या होते. त्यांची पर्सनल लाइफ, फॅमिली लाइफ, इंटरपर्सनल लाइफ डिस्टर्ब होऊ लागते. (Image Credit : psychologies.co.uk)

जे लोक फार जास्त इमोशनल असतात त्यांना कोणत्याही गोष्टीची समाधान शोधण्याची किंवा उपाय शोधण्यात फार अडचण येते. याकारणाने सतत ते तणावाचे शिकार राहतात. याच कारणाने हे लोक कोणत्याही गोष्टीला मॅक्सिमाइज म्हणजे फार मोठी करून विचार करतात. याच कारणाने हे लोक त्यांच्या इमोशनल समस्यांसोबत डील करू शकत नाहीत.

अॅडजस्टमेंट डिसऑर्डर - जे लोक फार जास्त इमोशनल असतात त्यांनी ही समस्या अधिक असते. ते कोणतीही समस्या फार मोठी करून बघतात. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या सोल्यूशनला ते फार लहान करून बघतात. त्यामुळे हे लोक नेहमी दबावात राहतात. म्हणजे त्यांना घरी, ऑफिसमध्ये किंवा मित्रांमध्ये अॅडजस्ट करण्यात अडचण येते.

झोप न येण्याची समस्या - अतिसंवेदनशील लोकांमध्ये चेन ऑफ थॉट्स म्हणजे सतत विचार करण्याची सवय असते. त्यामुळेच त्यांना झोप न येण्याची समस्या अधिक होते. मानसोपचारात याला एका लक्षणासारखं पाहिलं जातं. ज्याला स्लीप डिस्टर्बन्सेज म्हटलं जातं. इमोशनल लोक सतत एकाच घटनेबाबत किंवा गोष्टीबाबत विचार करत राहतात. त्यामुळे त्यांना झोप येण्याची समस्या होते.

रिजेक्शनची भीती - अधिक संवेदनशील लोकांमध्ये प्रेम व्यक्त करण्याबाबत अधिक कन्फ्यूजन असतं. त्यांनी रिजेक्शन भीती असते. ते सतत विचार करत राहतात की, समोरच्या व्यक्तीने नकार दिला तर याने सामान्य नातंही खराब होऊ शकतं. असा विचार करून ते स्वत:त अधिक गुंततात आणि क्षमतेपेक्षा जास्त काम करू लागतात.

एकटेपणा होतो हावी - अधिक संवेदनशीलतेमुळे एंग्जायटीच्या जाळ्यात आलेले लोक नेहमीच आजूबाजूच्या अशा लोकांसोबत बोलणं बंद करतात, ज्यांच्या बोलणं त्यांना वाईट वाटतं. मग ते ऑफिस असो वा घर. हळूहळू हे लोक सर्वांपासून दूर जातात. त्यांच्या एकटेपणाची भावना वाढू लागते. (Image Credit : lite987.com)

एंग्जायटीचे शिकार - कोणतीही स्थिती समजून न घेता आणि कोणतीही गोष्ट पूर्णपणे ऐकून न घेता लोक लगेच निष्कर्षावर पोहोचतात. यामुळे हे लोक अधिक चिंतेत असतात. त्यांना जुन्या गोष्टी सतत सतावत असतात. म्हणजे ते जुन्या गोष्टी धरून ठेवतात. यामुळे ते एंग्जायटीचे शिकार होतात.

डिप्रेशनचा धोका - मित्र आणि परिवारातील लोकांसोबत बोलणं बद केल्यायवर इमोशनल लोकांचा स्वभाव अधिक चिडचिड करणारा होतो आणि हळूहळू ते डिप्रेशनकडे जात असतात. त्यांना ही समस्या होते कारण ते दुसऱ्यांच्या गोष्टी फार गंभीरतेने घेतात आणि स्वत:च्या मनातील काही व्यक्त करत नाही.