मनुक्यांच्या पाण्याने रक्ताची कमतरता आणि हार्ट अटॅकचा धोका होईल दूर, जाणून घ्या कसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 17:12 IST2020-03-03T16:49:35+5:302020-03-03T17:12:52+5:30

चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. डॉक्टरकडे जाण्यापासून घरगुती उपायांचा वापर करण्यापर्यंत अनेक उपाय आपण करतो. वाढत्या वयात मधूमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू नये म्हणून आपण आधीच काळजी घेणं गरजेचं आहे.

तुम्ही आवड म्हणून किंवा एखाद्या पदार्थात मनुके खात असाल आज आम्ही तुम्हाला मनुक्यांचं पाणि प्यायल्याने शरीराला होत असलेल्या फायद्यांबदद्ल सांगणार आहोत.

मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने हृदय रोगापासून तुम्ही वाचू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल लेवल कमी होते आणि स्ट्रोक, हाय बीपी आणि हार्ट अॅटकपासून वाचू शकतात.

जर तुम्हाला पोट साफ होण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही रोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. कारण त्यामुळे गॅस एसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत होईल. सतत पोट साफ व्यवस्थित होईल.

किडनी स्टोन सारख्या गंभीर आजारांपासून सुद्धा मनुक्यांच्या पाण्याने लांब राहता येऊ शकतं. मनुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्निशियम असते. रोज याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी निरोगी राहते.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून बॉडी डीटॉक्स करण्यासाठी मनुक्याचं पाणी पिणं गरजेचं आहे.

मनुक्यांच्या पाण्यात आर्यन आणि कॉपर असतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा एनिमियासारखे आजार झाले असतील तर या पाण्याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदे होत असतो.

जर तुम्हाला कमी वेळेत चांगला परिणाम आरोग्यावर व्हायला हवा असं वाटत असेल तर काळ्या मनुक्यांचे सेवन फायदेशीर ठरेल. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी मनुक्यांचं पाणी फायदेशीर ठरत असतं.

हाडांना मजबूती देण्यासाठी किंवा सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी मनुक्यांच्या पाण्याचा आहारात समावेश करावा

त्यासाठी ग्लासभर पाण्यात पुरेसे मनुके भिजवून ठेवा. रात्रभर तसंच ठेवून सकाळी या पाण्याचं सेवन करा.

















