नियमित प्या संत्र्याचा रस; होतील फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:13 IST2019-05-12T16:58:35+5:302019-05-12T17:13:34+5:30

संत्र्याचा रस प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. रोगाच्या साथींपासून बचाव करण्यात संत्र्याचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्त वाहिन्यांचं रोगांपासून रक्षण करण्याचं काम संत्र्याचा रस करतो.
पाव लीटर संत्र्याच्या रसात 110 कॅलरीज असतात. आपल्या शरीराला दररोज आवश्यक असलेल्या एकूण व्हिटामिन सीपैकी 67 टक्के व्हिटामिन सी यातून मिळतं.
संत्र्याच्या रसात व्हिटामिन सीचं प्रमाण भरपूर असल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, तापासारख्या त्रासापासून संरक्षण होतं.
संत्र्याच्या रसामुळे कॅन्सरसारख्या धोक्यांची शक्यता कमी होते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकादेखील कमी होतो.
संत्र्याच्या रसात सायट्रिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
संत्र्याच्या रसात झिरो फॅट असल्यानं वजन कमी करण्यास मदत होते.
संत्र्याचा रस त्वचेसाठी फायदेशीर असतो. त्वचेतला तजेला कायम ठेवण्यात संत्र्याचा रस महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे त्वचा कायम तजेलदार राहते.