कोथिंबिरीचे हे सहा फायदे तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 22:42 IST2017-09-18T22:34:22+5:302017-09-18T22:42:17+5:30

कोथिंबिरीचा आहारात समावेश ठेवल्यास भूक वाढण्यास मदत होते.

अतिसार किंवा पचनाच्या अडचणींवरही कोथिंबीर उपयुक्त असते. त्यामुळे कोथिंबिरीचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

डोळ्यांची जळजळ किंवा आग होत असल्यास कोथिंबिरीचा १ किंवा २ थेंब रस डोळ्यात टाकावा. डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील मुरुमांसाठीही कोथिंबीर उपयुक्त ठरु शकते. एक चमचा कोथिंबिरीच्या रसात हळद टाकून ते मिश्रण मुरुमांवर लावावे.

मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धने आणि साखर टाकून ते पाणी प्यावे त्याचा निश्चितच फायदा होतो.

गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा जास्त त्रास होत असल्यास भातामध्ये धनेपावडर घालून खावे. नक्कीच फरक होतो