२०५० पर्यंत चारपैकी एकाला श्रवणदोष, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 02:14 PM2021-03-04T14:14:27+5:302021-03-04T14:27:02+5:30

World Health Organization report : श्रवणदोषांवर योग्य उपचार उपलब्ध नसणे ही मोठी समस्या आहे. 

येत्या ३० वर्षांत जगातील प्रत्येक चार जणांपैकी एकाला श्रवणदोष असेल, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रकाशित केला आहे.

श्रवणदोषाची ही व्याप्ती वाढू नये यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे असून त्यावरील उपचारपद्धतींसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे...

या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. श्रवणदोष दूर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व उपचारांचा त्यात समावेश आहे. त्यानुसार दरवर्षी प्रतिव्यक्ती १.३३ डॉलर खर्च येईल, असे डब्ल्यूएचओने अहवालात म्हटले आहे.

श्रवणदोषांवर योग्य उपचार उपलब्ध नसणे ही मोठी समस्या आहे. दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी असलेल्या देशांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.या देशांतील सुमारे ८० टक्के लोकांना श्रवणदोष आहेत.

त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. श्रीमंत देशांमध्येही अनेकदा श्रवणदोषांवर मिळणारे उपचार पुरेसे नसतात तसेच कानाच्या आजारांविषयीची योग्य माहिती नसल्यानेही उपचारांची आबाळ होते. 

लहान मुलांमध्येही कानाच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र लहान मुलांमधील ६०% श्रवणदोष बरे करता येतात.

जगभरात १.६ अब्ज लोकांना श्रवणदोष होता२०५० पर्यंत त्यात दीडपटीने वाढ होऊन २.५ अब्ज लोकांमध्ये श्रवणदोष निर्माण होईल.

२.५ अब्ज लोकांपैकी  ७० कोटी लोकांमध्ये हा दोष गंभीर स्वरूपाचा असेल ज्यासाठी उपचारांची गरज असेल. 

Read in English