Coronavirus: कोरोना संपुष्टात आल्यानंतर कसं असणार आपलं आयुष्य?; तज्ज्ञांनी सांगितलं...

By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 02:52 PM2021-01-04T14:52:56+5:302021-01-04T14:55:47+5:30

कोरोना विषाणूमुळे मागील वर्ष खूप वाईट गेले. या एका वर्षाने मनुष्याला जगण्याचा एक नवीन मार्ग दिला आहे. सामान्य जीवनशैलीत असे बरेच बदल झाले आहेत ज्याचा कोणीही कधी विचारही नव्हता. यातील काही बदल असे आहेत की ते पुढे राहू शकतात.

जगभरातील तज्ञांचा हवाला देऊन कोरोना महामारी संपल्यानंतर जीवनात कोणते बदल घडू शकतात हे आपण जाणून घेऊया? कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये लोकांचे जनजीवन ठप्प झाले, लाखो लोक कोरोनाचे बळी पडले, १० महिन्यांहून अधिक काळ लोकांना घरातच बसावं लागलं, लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले.

टूलेन विद्यापीठाचे इतिहासकार जॉन बॅरी यांचे म्हणणे आहे की, येत्या सहा महिन्यांत होणार्‍या बदलांचा पुढील आयुष्यावर मोठा परिणाम होईल. जर लस प्रभावी असेल तर कोरोना विषाणूपासून प्रतिकारशक्ती बर्‍याच वर्षांपर्यंत राहील.

ऑनलाईन औषधे येऊ शकतात जी कोरोनाविरूद्ध प्रभावी ठरेल. जलद प्रतिजैविक चाचणी अधिकाधिक वापरली जाईल. लोक घरातूनच काम करतील. इंटरनेटचा वापर अधिक असेल. रस्त्यावर सार्वजनिक वाहतूक कमी होईल आणि खासगी वाहने जास्त होतील. जॉन बॅरीने 'द ग्रेट इन्फ्लूएंझा: द स्टोरी ऑफ डेडलीसेट पॅन्डमिक इन हिस्ट्री' हे पुस्तकही लिहिले आहे.

ओक्लाहोमा विद्यापीठाच्या वैद्यकीय एंथ्रोपोलॉजिस्ट कॅथरीन हर्शफिल्ड म्हणतात की, कोरोना विषाणूच्या समाप्तीपर्यंत राजकीय विभागणी अधिक होईल. आर्थिक असमानता वाढेल. कॉन्सपीरेंसी थेअरीज सोशल मीडियावर येतच राहतील.

सन २०२१ मध्ये, लोक केवळ कोरोना विषाणूच्या लसी मागे धावताना दिसतील, यानंतर, कोरोना विषाणू महामारी कमी होण्यास सुरूवात होऊ शकते. संपणार नाही. आपल्या सामाजिक दूरीमुळे नवीन आजार महामारी होऊ शकते. कॅथरीन यांनी गँगस्टर स्टेट्सः ऑर्गनाइज्ड क्राइम, क्लेप्टोक्रेसी अँड पॉलिटिकल कोल्प्स हे पुस्तक लिहिले आहे.

इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टनच्या समाजशास्त्रज्ञ अण्णा म्यूलर म्हणतात की ऑनलाईन शिकवणी कशी होऊ शकते हे कोरोना महामारीने शिकवलं, यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व आहे त्यांना अधिक सुलभ झाले. ज्यांना बर्‍याच वेळा भयानक वेदना होत होती. आता ऑनलाइन वर्गांची संस्कृती वेगाने वाढेल.

पण त्यामागेही एक वेगळा पैलू आहे. कोरोना विषाणूच्या काळात, ज्या कुटुंबांची रोजीरोटी गेली होती, त्यांची मुले महामारी संपुष्टात येईपर्यंत दारिद्र्य, असुरक्षितता आणि मानसिकेतेच्या दबावात राहतील. याचा थेट परिणाम मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासावर होईल.

हार्वर्ड विद्यापीठाचे समाजशास्त्रज्ञ मारिओ लुई स्मॉल म्हणाले की, कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला इंटरनेटशी जोडले आहे. कोरोना व्हायरस संपल्यानंतरही कंपन्या, संस्था, सरकार आणि लोक प्रवास करणे टाळतील. शारीरिक संपर्क आणि संमेलनाऐवजी ऑनलाइन भेट घेतील. या काळात, लोक एकटे राहून नैराश्येशी लढायला देखील शिकले आहेत. कारण हा आजार असा आहे की वेळोवेळी डोकेवर काढत राहिल. लोकांना भविष्यात देखील लॉकडाऊन किंवा आयसोलेशनचा सामना करावा लागू शकतो.

ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचा इतिहासकार क्रिस्टोफर मॅक नाईट निकोलस म्हणाले की, कोरोना महामारी संपल्यानंतर लोक पुन्हा भटकंती करण्यात तयार राहतील. लोकांची गर्दी होईल, लाईव्ह संगीत मैफिली आणि खेळ आयोजित केले जातील. १९२० मध्ये ते झालं होतं, १९१८ चा इन्फ्लूएन्झा (साथीचा रोग) आणि पहिल्या महायुद्धानंतर जग मोकळे झाले तेव्हा तेच घडले होते, लोक दोन वर्षे स्वतंत्रपणे राहत होते, नंतर सर्व एकत्र आले.