शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : काय आहे कम्युनिटी स्प्रेड किंवा कम्युनिटी ट्रान्समिशनचा नेमका अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 2:30 PM

1 / 8
दिल्लीमध्ये आता कोरोना व्हायरस संक्रमणाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत बोललं जात आहे. सोमवारी दिल्ली सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, दिल्लीत कम्युनिटी स्प्रेड होत आहे. पण भारत सरकार दिल्ली कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं मानण्यास नकार दिलाय. पण नेमकं हे कम्युनिटी स्प्रेड किंवा कम्युनिटी ट्रान्समिशन कसं होतं? चला जाणून घेऊ उत्तर...
2 / 8
कम्युनिटी ट्रान्समिशन कोरोना व्हायरसची थर्ड स्टेज असते. ही स्टेज तेव्हा येते जेव्हा एखाद्या मोठ्या परिसरातील लोक व्हायरसने संक्रमित होतात. या ठिकाणाची स्थिती गंभीर स्टेजवर जाऊन पोहोचते.
3 / 8
कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये एखादी अशी व्यक्तीही संक्रमित होऊ शकते, जी ना कोरोना व्हायरसने प्रभावित देशातून परतली असेल ना ती व्यक्ती कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली असेल.
4 / 8
अनेक देशांमध्ये रिसर्चमधून असेही सांगण्यात आले आहे की, कम्युनिटी स्प्रेड झाल्यावर यापासून बचाव करणं कठिण होऊन बसतं. तसेच या स्टेजमध्ये हे कळत नाही की, एखाद्या व्यक्तीला संक्रमण कुठून झालं.
5 / 8
मार्चपर्यंत देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे लोकल ट्रान्समिशनच्या स्टेजमध्ये होता. लोकल ट्रान्समिशन म्हणजे एखादी व्यक्ती परदेशातून परतलेल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येते आणि संक्रमित होते. म्हणजे लोकल ट्रान्समिशनमध्ये हे माहीत असतं की, व्हायरस कुठून पसरला.
6 / 8
याचा फायदा हा असतो की, यात रूग्ण कुणाच्या संपर्कात आला होता त्याच्याशी संबंधित लोकांची माहिती मिळवणं सोपं जातं. सर्वात धोकादायक असते चौथी स्टेज. चीन चौथ्या स्टेजमध्ये होता. अशात यावर उपाय शोधणं कठिण होतं.
7 / 8
आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर कम्युनिटी स्प्रेड म्हणजे तुम्ही कोरोना व्हायरसची लागण असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले नसाल तरी तुम्हाला कोरोनाची लागण होते.
8 / 8
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेननुसार, ही कोरोना व्हायरसची तिसरी स्टेज आहे. म्हणजे पहिली स्टेज जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती तुमच्या क्षेत्रात येते. दुसरी स्टेज म्हणजे त्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक कोरोना व्हायरसने पीडित होतात. आणि तिसरी स्टेज म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता तुम्हाला लागण होणे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdelhiदिल्ली