धोका वाढला! आता घरातही वेगाने पसरू शकतं कोरोनाचं संक्रमण; संशोधनातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 19:34 IST2020-06-18T18:44:23+5:302020-06-18T19:34:35+5:30

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजारावर उपचार शोधण्यासाठी तसंच वाढता प्रसार रोखण्यासाठी संशोधनही सुरू आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या लसीसाठी आणि औषधासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टेंसिंगचे पालन केलं जात आहे.
कोरोना विषाणूचं जुन्या सार्स विषाणूच्या तुलनेत घरातील परिस्थितींवर दुप्पट संक्रमित होणारा आहे. विशेषत: हा संसर्ग पसरल्यानंतरच त्याची लक्षणं समोर येतात. त्यामुळे हा संसर्ग घरातच मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि चीनमधील तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, या अभ्यासामुळे कोरोनाचं संक्रमण कमी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.
या संशोधनासाठी चीनच्या गुआंगझोऊ शहरातील संशोधकांनी ३५० रूग्ण व त्यांच्या जवळपास २००० संपर्कांमधील लोकांचा डेटा वापरला. यामध्ये त्यांनी अशा लोकांचा अभ्यास केला ज्यांना लोकांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाचं संक्रमण झालं होतं. त्यांच्या लक्षणांवरून कोरोना हा घरातच जास्त पसरू शकतो असं दिसून आलं.
जर एखाद्याला कोरोना झाला तर रूग्णाच्या कुटुंबातील आणि त्याच्या शेजारील लोकांना कोरोना होण्याची जास्त शक्यता आहे. सर्वात घातक म्हणजे, जर कोरोना एखाद्यामुळे दुसऱ्याला कोरोना झाला तर त्या दुसऱ्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसतात आणि त्यांना धोका जास्त असतो असं या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
ज्या खोलीत गरमी असते किंवा पुरेसे व्हेंटिलेशन नसेल अशा ठिकाणी कोरोनाचा प्रसार जास्त होतो. ते सुद्धा अशा लोकांकडून ज्यांना संक्रमण झालंय याची माहितीदेखील नसते.
तर संशोधकांनी यामध्ये महत्त्वाची माहिती अशी दिली की, जर आयसोलेशन वॉर्ड किंवा क्वारंटाईन सेंटर उभारले नसते तर या कोरोनाने हाहाकार अधिक माजला असता आणि त्यामुळे २० ते ५० टक्के लोक संक्रमित झाले असते.
(Image credit- mynaijablog.Com)